तब्बल ‘इतके’ कोटी जनधन अकाऊंट निष्क्रिय, तुम्ही तर यात नाहीत ना? चेक करा

MHLive24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :-  प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत लोकांना बँकेत जन धन खाते उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे. वंचित लोकांना ही सुविधा पुरवण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाने प्रधानमंत्री जन धन योजना सुरू करण्यात आली. केंद्र सरकारने मंगळवारी सांगितले की, प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत 5.82 कोटी खाती निष्क्रिय आहेत आणि महिलांच्या निष्क्रिय खात्यांची संख्या सुमारे 2.02 कोटी आहे.

राज्यसभेतील लेखी उत्तरात वित्त राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जुलै 2021 पर्यंत प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत सुप्त खात्यांची एकूण संख्या 5.82 कोटी आहे. . ते म्हणाले की निष्क्रिय खात्यांच्या संख्येची टक्केवारी मार्च 2020 मध्ये 18.08 टक्क्यांवरून जुलै 2021 मध्ये 14.02 टक्क्यांवर आली आहे.

खाते निष्क्रिय कधी होते ? :- भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, जर एखाद्या खात्यात सलग दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक दिवस कोणताही जमा-खर्चाचा व्यवहार झाला नाही तर ते खाते इनऑपरेटिव्ह अर्थात निष्क्रिय होतं. म्हणजे 5.82 कोटी जन धन खाती अशी आहेत, ज्यामध्ये दोन वर्षांपासून कोणतेच व्यवहार झालेले नाहीत. हा चिंतेचा विषय यासाठी आहे की ज्या गरिबांच्या कल्याणासाठी अशी खाती उघडण्यात आली, त्यांच्या खात्यात सरकारकडून विविध योजनांचे पैसे, ग्रामीण रोजगार हमीचे पैसे पाठवले जातात.

Advertisement

जुनं सेव्हिंग खातं जनधन खात्यात बदला :- तुमचं जुनं सेव्हिंग खातं असेल तर ते जनधन खात्यात रुपांतरित करता येतं. त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. तसंच आपल्या खात्याच्या RuPay कार्डसाठी अर्ज करावा लागेल. वैध अर्ज भरुन तुमचं खातं जनधन खात्यात बदललं जाऊ शकतं.

आधार कार्डद्वारे निष्क्रिय खाते सक्रिय करा :- तुम्ही आधार कार्डद्वारे जनधन अकाऊंट सुरु करु शकता. जर या खात्यात कोणताही व्यवहार झाला नाही तर ते बंद होऊ शकतं. मात्र पुन्हा ते सुरु करण्यासाठी तुम्हाला या खात्यात व्यवहार सुरु ठेवावा लागेल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker