Business Loan : छोटा व्यवसाय करणाऱ्यांना मिळणार चुटकीसरशी कर्ज, जाणून घ्या सरकारचे ‘हे’ प्लॅनिंग

MHLive24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- छोट्या व्यापाऱ्यांना सहज आणि जलद कर्ज उपलब्ध व्हावे या हेतूने माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी बँकिंग उद्योगाला मोठे आवाहन केले आहे.(Business Loan )

UPI सारखे एक मजबूत आणि अखंड डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावे जेणेकरून छोट्या व्यापाऱ्यांना सहज आणि जलद कर्ज उपलब्ध होईल असे ते म्हणाले.

वैष्णव यांनी बँकिंग उद्योगाला तीन महिन्यांतयासंदर्भात एखादी आयडिया आणून त्यावर तोडगा काढण्यास सांगितले आहे.

Advertisement

ते म्हणाले की आधार, मोबाईल फोन, UPI प्लॅटफॉर्म आणि डिजीलॉकरची मजबूत इकोसिस्टम पाहता, असा प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी आवश्यक बेस आधीच अस्तित्वात आहे.

‘डिजिटल पेमेंट फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होऊन वैष्णवने बँकर्ससमोर ‘आव्हान’ दिले आहे. “सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME), छोटे व्यावसायिक यांना जलद आणि सुलभ कर्ज देण्यासाठी UPI प्लॅटफॉर्मसारखे शक्तिशाली, चांगले आणि डिजिटल प्लॅटफॉर्म आपण बनवू शकतो का?” अशी त्यांनी विचारणा केली.

केंद्रीय मंत्री बँकर्सना म्हणाले, “आज तुमच्याकडे आधार, मोबाईल फोन, UPI प्लॅटफॉर्म, डिजिलॉकरची चांगली इकोसिस्टम आहे. तुम्हाला कर्ज देणारी इकोसिस्टम तयार करण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आज उपलब्ध आहे.”

Advertisement

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, तंत्रज्ञान देशाचे भविष्य घडवण्यात मोठी भूमिका बजावेल. ते म्हणाले की, डिजिटल पेमेंट क्षेत्रातील भारताची कामगिरी जगभरातील देशांना हेवा वाटणारी आहे.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker