Bill importance while buying gold : सोने खरेदी करताना बिलाचे किती अन कोणते आहे महत्व? खरे बिल कसे असले पाहिजे? जाणून घ्या

MHLive24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- गेल्या दोन वर्षांपासून मंदीचा सामना करणाऱ्या सराफा व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य परतले आहे. दिवाळीच्या सणाशी संबंधित असलेल्या धनत्रयोदशीच्या दिवशी हा चमत्कार घडला.(Bill importance while buying gold)

खरे तर या दिवशी दिल्लीसह देशातील सराफा व्यापाऱ्यांनी सोने, चांदीचे दागिने आणि इतर वस्तूंचा चांगला व्यवसाय केला.

परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की, आयुष्य जगताना अनेक टप्प्यांवर आर्थिक समीकरणेही बदलतात. या आणि अशा अनेक बदलांमुळे आर्थिक गणिते बदलतात.

Advertisement

हे बदल योग्य प्रकारे हाताळले गेले, तर त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होतो. यासाठी आधीपासूनच काही बाबतीत सावध असावे.

उदा. जे सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल त्यावर हॉलमार्किंग आहे की नाही हे तपासून घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बिलासंदर्भातील . बिलाशिवाय सोने खरेदी करू नका. जीएसटी कर वाचवण्यासाठी बिल टाळले जाते.

योग्य आणि खरे बिल घेऊनच सोने खरेदी करा. मात्र जर त्या दागिन्यांमध्ये काही खोट किंवा अडचण निर्माण झाली तर बिलाशिवाय सराफ ते दागिने स्वीकारणार नाही. ते दागिने विकताना तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल.

Advertisement

काय आहे बीआयएसच्या सूचना

ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सराफाकडून मिळालेल्या बिल किंवा चलानमध्ये हॉलमार्क असणाऱ्या वस्तूंची माहिती व्यवस्थित दिलेली असली पाहिजे. हॉलमार्क असणाऱ्या दागिन्यांच्या बिलात प्रत्येक वस्तूचे विवरण, किंमतीची माहिती, शुद्धता, धातूचे शुद्ध वजन, कॅरेट आणि हॉलमार्किंग चार्ज यांचा उल्लेख असला पाहिजे.

हॉलमार्क असणाऱ्या वस्तूंच्या बिलात असेही लिहिलेले असले पाहिजे की ग्राहक हॉलमार्क असणाऱ्या दागिने किंवा वस्तूंच्या शुद्धतेला बीआयएसद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही केंद्रात तपासू शकतात.

Advertisement

कसे असावे बिल

समजा तुम्ही सराफाकडून सोन्याचे दागिने खरेदी केले. तुम्ही १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याची चैन खरेदी केली. अशावेळी तुमच्या बिलात पुढीलप्रमाणे माहिती असायला हवी.

उदा

Advertisement

वस्तूचे नाव – सोन्याची चैन
संख्या- १
वजन- १० ग्रॅम
शुद्धता- २२ कॅरेट
सध्याचा सोन्याचा भाव आणि मेकिंग चार्ज
हॉलमार्किंगचे शुल्क- ३५ रुपये + जीएसटी
ग्राहकाने द्यावयाची एकूण रक्कम

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker