धक्कादायक! जगात कोरोनाची तिसरी लाटही येणार; तज्ज्ञ म्हणतात…

Mhlive24 टीम, 28 सप्टेंबर 2020 :- जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचं संकट पसरलेलं आहे. सुरुवातीला युरोपात आणि अमेरिकेत वेगाने रुग्ण वाढत होते. आता तिथे कोरोनाचा आलेख सपाट झाला म्हणजे बेसुमार वाढ थांबली. 

मात्र सध्या ब्रिटन आणि कॅनडामध्ये  मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं म्हटलं आहे.

अशा परिस्थिती आता तज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अद्याप हे स्पष्ट नाही झाले आहे, कोरोनाच्या कोणत्या स्थितीला नवीन लाट म्हणावे.

Advertisement

यातच यूकेच्या एडिनबर्ग विद्यापीठातील संसर्गजन्य रोगांचे प्राध्यापक मार्क वूलहाऊस यांनी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे.  independent.co.uk च्या रिपोर्टनुसार, ब्रिटिश कोरोना तज्ज्ञ मार्क वूलहाऊस म्हणतात की, लॉकडाऊनमुळे कोरोना दूर करत नाही, 

तर समस्या थोडीशी वाढते. ब्रिटनमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, आणि देशात आता पुन्हा राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर करण्याची परस्थिती आली आहे. प्राध्यापक मार्क वूलहाऊस यांनी सांगितले की, 

कोरोना टाळण्यासाठी कठोर पावलं उचलली पाहिजेत जेणेकरून या संसर्ग कमी होईल, मात्र व्हायरस कायमचा जाऊ शकत नाही. बीबीसी वन कार्यक्रमात मार्क यांनी, ब्रिटन संदर्भात सांगितले की, देशातील परिस्थिती पाहता सप्टेंबरमध्ये पुन्हा लॉकडाउनची आवश्यकताही होती. 

Advertisement

जेव्हा प्रोफेसर मार्क वूलहाऊस यांना विचारले गेले की कोरोनाची तिसरी लाटही येईल का, तेव्हा ते म्हणाले की ते पूर्णपणे शक्य आहे. ते म्हणाले की, जर लस येत्या 6 किंवा 12 महिन्यांत येत नसेल, तर आपल्याला पर्यायी मार्ग शोधण्याची गरज आहे. दरम्यान,  

वाढते कोरोनाचे संक्रमण पाहता जगभरात लोक लस येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तसे संशोधनही जगभर सुरु आहे. अद्याप रशियाने आपली लस लॉन्च केली आहे. तर भारतात तीन लशींचे उत्पादन प्रगतीपथावर आहे. 

यात  ‘सीरम इन्स्टिटयूट’, ‘झाइडसकॅडिला’ आणि ‘भारतबायोटेक’ या तीन कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू आहे. यातील ‘सीरम इन्स्टिटयूट’ची लस लवकरच  येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker