धक्कादायक! हजारो सरकारी कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात घालत दिली कोरोनाची असुरक्षित लस

Mhlive24 टीम, 28 सप्टेंबर 2020 :-जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे.

आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत. ही लस बनवताना अनेक मानके असतात. त्यांच्या चौकटीत राहूनच लस बनवावी लागते.

परंतु चीनमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चीनच्या सरकारी कंपन्यांनी कामगारांना अनधिकृत कोव्हिड-19 लस दिली आहे.

Advertisement

लोकांचा देण्यात येणारी ही चिनी लस जागतिक स्तरावर प्रमाणित नाहीये. कामगारांनंतर ही लस सरकारी अधिकारी आणि लस कंपनीतील

कर्मचार्‍यांना दिली जाणार आहे. यानंतर, शिक्षक, सुपरमार्केट कामगार आणि धोकादायक भागात प्रवास करणारे लोक असतील. 

असे असूनही, चिनी अधिकारी पारंपारिक स्क्रिनिंग प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून हजारो लोकांना लसीकरण करीत आहेत.

Advertisement

चीनमधील कोरोनाची लस किती लोकांना मिळाली हे या क्षणी स्पष्ट झालेले नाही. बीजिंगमधील कंपनी सायनोवाक

यांनी सांगितले की बीजिंगमध्ये 10,000 पेक्षा जास्त लोकांना त्याची लस देण्यात आली आहे. लशीच्या परिणामाची चिंता न करता

सरकार ज्यांचे काम महत्वाचे वाटेल अशा कामगारांमध्ये ही लस देत आहे. या लशीबाबत चीन अंत्यत घाई करत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker