धक्कादायक बातमी! ‘ह्या’ PF खात्यातून कोट्यवधींची फसवणूक, तुमचे खाते तर नाही ना? वाचा…

MHLive24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :-  सध्या कोरोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. परंतु या संकटात देखील गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. मार्च २०२० आणि जून २०२१ दरम्यान, जेव्हा संपूर्ण देशाचे लक्ष वाढत्या कोरोनाच्या साथीवर आणि लॉकडाऊनवर होते, तेव्हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) मुंबईतील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सामान्य व्यक्तींच्या नावावर २१ कोटी रुपयांचा गंडा घातला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, कॉमन पीएफ पूलद्वारे फसवणूक करण्यात आलीय. यापैकी सुमारे २१ कोटी रुपये काढण्यात आलेत. आतापर्यंत केलेल्या तपासानुसार घोटाळ्याचा “मास्टरमाईंड” मुंबई कांदिवली ईपीएफओ कार्यालयाचा ३७ वर्षीय अधिकारी चंदन कुमार सिन्हा असल्याचे सांगितले जातेय, ज्याने पीएफ दावा करण्यासाठी स्थलांतरित कामगाराच्या ८१७ बँक खात्यांचा कथितपणे गैरवापर केला होता. या पीएफ खात्यातून एकूण २१.५ कोटी रुपयांची हेराफेरी करण्यात आली आहे.

या खात्यांमध्ये हस्तांतरित केलेल्या पैशांपैकी ९० टक्के रक्कम काढण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. याशिवाय मुंबई कार्यालयातील ५ कर्मचारी या फसवणुकीमध्ये सामील आहेत, त्यापैकी मुख्य आरोपी फरार आहेत. अंतर्गत लेखापरीक्षण पूर्ण होताच ईपीएफओ हे प्रकरण सीबीआयकडे सोपवणार असल्याचे सांगितले जात आहे. द इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Advertisement

मिस्ड कॉलद्वारे अशा प्रकारे बॅलन्स तपासा :- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 ला मिस्ड कॉल द्या. यानंतर तुम्हाला EPFO कडून एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या PF खात्याचा तपशील मिळेल. यासाठी बँक खाते, पॅन आणि आधार यूएएनशी जोडलेले असणे आवश्यक आहे. या सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker