धक्कादायक! वृद्धाचे हातपाय बांधून ३० तोळे सोने लांबवीले

MhLive24 टीम , 24 जुलै  2020 :- नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहराच्या मध्यठिकाणी असलेल्या जानकीलाल राठी चौकातील हरीप्रसाद सारडा यांच्या राहत्या घरी चार ते पाच दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत त्यांचे हात बांधुन सोने व नगदी रोखरक्कम दोन लाख रुपये असा एकुण ११ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

सारडा यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता त्या दरोडेखोरांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत तेथुन लगेचच पोबारा केला. ही घटना गुरुवार (ता. २३) च्या पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी: हरीप्रसाद सारडा असे घर मालकाचे नाव आहे.

अयोध्या निवास स्थानी सारडा आणि एक मोलकरीण राहतात. गुरुवारी रात्री सारडा जेवण करुन पहिल्या मजल्यावर झोपले होते. रात्री २ वाजता घराच्या दारावर थाप मारल्याचा आवाज आल्याने त्यांनी दार उघडले.

Advertisement

दार उघडताच चार ते पाच युवकांनी त्यांना धक्का देऊन घरात प्रवेश केला. ”सोना कहाँ है… चाबी जल्दी दे…वर्ना जान से हात धोयेगा” असे धमकावत त्यांचे व मोलकरणीचे हातपाय व तोंड बांधले.

कपाटातील ३० तोळे सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम लंपास करत धुम ठोकली. हरीप्रसाद सारडा यांच्या फिर्यादीवरून हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker