Mhlive24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- न्यायाच्या चौकटीत अपराध्यांना शिक्षा व पीडितांना न्याय मिळवून देणाऱ्या न्यायाधीशांच्या कुटुंबीयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची हेराफेरी करुन सुमारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी एकाला मंगळवारी रात्री उशिरा अटक केली.
नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात आकाशवाणी चौकाजवळ मुक्ता बोबडे यांची वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता आहे. त्यावर बोबडे कुटुंबाने अनेक वर्षांपूर्वी सीजन्स लॉन तयार केले होते. मागील 13 वर्षांपासून सीजन्स लॉनच्या देखरेखीसाठी तापस घोषला नावाचा व्यवस्थापक ठेवलं होतं.
लॉनमध्ये येणाऱ्या बुकिंग्स घेणे, लॉनची देखरेख करणे, आलेले पैसे लॉन संदर्भात आवश्यक कामासाठी खर्च करणे आणि उर्वरित रक्कम मुक्ता बोबडे यांच्या खात्यात जमा करणे अशी जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती.
2016 पासून तापस घोष ने मुक्ता बोबडे यांच्या वयाचा आणि आजारपणाचा गैरफायदा घेत सिसन्स लॉनच्या हिशेबात अफरातफर सुरू केली. विविध खर्चाच्या आणि लॉनच्या देखभाल दुरुस्तीच्या बनावट पावत्या तयार करून लॉनच्या कारभारात घोटाळा केला.
जेव्हा मुक्ता बोबडे यांनी 2013 पासून लॉनच्या कारभरामधील हिशेब विचारले तेव्हा तापस घोष याने योग्य माहिती दिली नाही.
गेल्या काही वर्षापासून हा प्रकार सुरु होता. हा प्रकार बोबडे कुटुंबियांच्या नुकताच लक्षात आला. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडे याची तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घोष याला अटक केली आहे.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर