‘५०-५० फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेने भाजपसोबत सरकार बनवावं’

Mhlive24 टीम, 28 सप्टेंबर 2020 :-  शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं. 

त्यातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक वक्तव्य केलं आहे. भाजपशी युती झाल्यास शिवसेनेचाच फायदा होईल. 50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेने भाजपसोबत सरकार बनवावं आणि मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावं, असं रामदास आठवले म्हणाले.

एका मीडियाशी  संवाद साधताना ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची शनिवारी एका पंचतारांकित हॉटेलात बैठक झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे समजते.

Advertisement

मात्र फडणवीस – राऊत यांच्यातील बैठकीनंतर राष्ट्रवादी आणि विशेषतः काँग्रेस या शिवसेनेच्या मित्रपक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसेनेबद्दल संशय व्यक्‍त होत आहे.  गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना-भाजपची युती आहे.

 देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झाली. राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असं त्यांचं म्हणणं. परंतु माझं मत आहे की शिवसेनेने भाजपसोबत यावं आणि रिपाइंला सोबत घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करावं. 

शिवसेनेला केंद्रात मंत्रिपदं मिळतील. असं झाल्यास मला आनंद होईल असे आठवले म्हणाले. उद्धव ठाकरें काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चक्रव्युहात अडकू नये. त्या चक्रव्युहात अडकल्यामुळे त्यांना काही करता येत नाही, 

Advertisement

अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-रिपाइं एकत्र आल्यास फायदा होणार आहे, महाराष्ट्राचं भलं होणार आहे. केंद्राकडूनही महाराष्ट्रासाठी भरपूर पैसे आणता येतील, असंही आठवले म्हणाले.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker