शिल्पा शेट्टीच्या आईची दीड कोटींची फसवणूक

MHLive24 टीम, 30 जुलै 2021 :- अश्लील व्हिडिओ प्रकरणात राज कुंद्राच्या अटकेमुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिल्पा शेट्टीच्या आईची दीड कोटींची फसवणूक झाली आहे. सुनंदा शेट्टी यांनी जुहू पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

खोटी कागदपत्रे बनवून जमीन विकली :- सुधाकर घारे मूळचे कर्जतचे शेतकरी आहेत. सुनंदा यांनी मे 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान सुधाकर यांच्याकडून कर्जत येथील एका जमिनीचा व्यवहार केला होता. या वेळी जमीन ही स्वत:च्या नावावर असल्याचे सांगून सुधाकरने जमीन व बंगल्याची खोटी कागदपत्रे बनवून सुनंदा यांना हे सर्व एक कोटी 60 लाखांना विकले. कालांतराने ही बाब सुनंदा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सुधाकरकडे पैशांसाठी तगादा लावला.

पैसे परत करण्याऐवजी धमकी :- सुधाकर हा एका राजकीय नेत्याचा जवळचा हस्तक असल्याचे सांगितले जाते. पैसे परत करणार नाही, कोर्टात जा अशी धमकी सुधाकर देत असल्याचे सुनंदा यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सुनंदा यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी जुहू पोलिस अधिक तपास करत आहे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker