Shares worth less than Vadapav : वडापावपेक्षाही कमी किमतीत येणाऱ्या शेअरची कमाल; एका लाखाचे केले 1 कोटी

MHLive24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- आर्थिक सुबत्ता असावी, भरपूर पैसा असावा, श्रीमंत व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी सर्वजण आयुष्यभर भरपूर मेहनतदेखील करतात. मात्र फक्त परिश्रम करून किंवा चांगला पगार असलेली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्य येणार नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची ठरते. (Shares worth less than Vadapav)

यासाठी पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी आणि काळाच्या ओघात जास्त रिटर्न देणारी असावी. यासाठी शेअरमार्केट उपयुक्त ठरेल. ज्यांमध्ये रिस्क घेण्याची क्षमता आहे त्यांना नक्कीच यात गुंतवणूक करून पैसे कमवता येतील. कारण यामध्ये पैसे टक्केवारीने नाही तर पटीने वाढतात.

आज अशाच एका शेअरबद्दल माहिती पाहुयात कि जो सात रुपयांत उपलब्ध होता आणि आज याचे गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत. त्या शेअरचे नाव वैभव ग्लोबल. वैभव ग्लोबल ही एक डायमंड आणि ज्वेलरी कंपनी आहे.

Advertisement

10 वर्षांपूर्वी, 16 सप्टेंबर 2011 रोजी, NSE वर वैभव ग्लोबलच्या शेअर्सची किंमत 7.13 रुपये होती. हीच किंमत 17 सप्टेंबर 2021 रोजी 718 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच वैभव ग्लोबलच्या शेअर्सचा परतावा या 10 वर्षात 100 पट झाला आहे.

गेल्या सहा महिन्यांत वैभव ग्लोबलच्या शेअर्सवर खूप विक्रीचा दबाव आहे. मार्च 2021 पासून मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वैभव ग्लोबलचे शेअर्सचा भाव वाढत राहिला. या दरम्यान, कंपनीचे समभाग 996.70 रुपयांवर पोहोचले होते. मात्र, यानंतर भरपूर प्रॉफिट बुकिंग झाले आणि समभागाची किंमत खाली आली.

* यंदाच्या वर्षात 40 टक्के रिटर्न्स
गेल्या काही महिन्यांमध्ये गुंतवणुकदारांनी विक्रीचा सपाटा लावला असूनही वैभव ग्लोबल कंपनीच्या समभागाचा भाव 510.42 रुपयांवरून 718 रुपयांवर गेला आहे. याचा अर्थ यंदाच्या वर्षात कंपनीच्या समभागांनी 40 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एक वर्षाचा कल पाहिला तर वैभव ग्लोबलचे शेअर्स 375.77 रुपयांवरून 718 रुपयांवर गेले आहेत. त्यानुसार या साठ्यांनी 91 टक्के परतावा दिला आहे.

Advertisement

गेल्या 5 वर्षांत, वैभव ग्लोबलच्या समभागाचा भाव 62.29 रुपयांवरून 718 रुपये इतका झाला. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये ₹ 1 लाख गुंतवले असते तर आज या गुंतवणुकीचे मूल्य साधारण 11.50 लाख रुपये इतके असेल.

जर आपण गेल्या 10 वर्षांचा रेकॉर्ड बघितला तर वैभव ग्लोबलच्या समभागाचा भाव 7.13 रुपयांवरून 718 रुपये इतका झाला आहे. या हिशेबाने जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी वैभव ग्लोबल शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे मूल्य 1 कोटी झाले असते.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker