Rakesh JhunJhunwala Portfolio : बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.

त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. सध्या शेअर बाजारात घसरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे हाल होत आहेत.

त्यामुळे शेअर बाजाराचा ‘बिग बुल’ म्हणवले जाणारे राकेश झुनझुनवालाही अस्पर्श राहिलेले नाहीत. त्यांनाही या काळात त्रास सहन करावा लागला आहे.

राकेश झुनझुनवाला यांना केवळ दोन शेअर्समध्ये घसरण झाल्याने महिनाभरात 540 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. स्टार हेल्थ आणि इन्शुरन्स आणि मेट्रो ब्रँड्सच्या शेअर्सच्या किमती गेल्या एका महिन्यात घसरल्या आहेत.

या कालावधीत मेट्रो बँडचे शेअर्स 562 रुपयांवरून 523 रुपयांपर्यंत घसरले. त्याच वेळी, स्टार हेल्थचे शेअर्स 700 रुपयांवरून 663 रुपयांपर्यंत घसरले. या दोन शेअर्सच्या घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला यांना 540 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

राकेश झुनझुनवाला यांचा वाटा किती? राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे स्टार हेल्थमध्ये एकूण 10,07,53,935 शेअर्स किंवा 17.50% शेअर्स आहेत. त्याच वेळी, राकेश झुनझुनवाला यांनी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्यामार्फत मेट्रो ब्रँड्समध्ये 39,153,600 शेअर्स किंवा 14.40% स्टेक खरेदी केला होता.

राकेश झुनझुनवाला यांचे मोठे नुकसान झाले राकेश झुनझुनवाला यांच्याकडे स्टार हेल्थ कंपनीचे 10,07,53,935 शेअर्स होते. गेल्या एका महिन्यात या समभागात 38.55 रुपयांची घसरण दिसून आली आहे. 38.55 × 10,07,53,935 = रु. 388 कोटी

त्याचप्रमाणे मेट्रो ब्रँड्सच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात प्रति शेअर 39.05 रुपयांची घसरण झाली आहे. 39,153,600×39.05 = रु. 152 कोटी