अबब! ऐंशी पैशाच्या शेअरने मिळवून दिले एक कोटी

MHLive24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- आर्थिक सुबत्ता असावी, भरपूर पैसा असावा, श्रीमंत व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी सर्वजण आयुष्यभर भरपूर मेहनतदेखील करतात. मात्र फक्त परिश्रम करून किंवा चांगला पगार असलेली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्य येणार नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची ठरते. यासाठी पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी आणि काळाच्या ओघात जास्त रिटर्न देणारी असावी. यासाठी शेअरमार्केट उपयुक्त ठरेल.(Multibagger Stock)

ज्यांमध्ये रिस्क घेण्याची क्षमता आहे त्यांना नक्कीच यात गुंतवणूक करून पैसे कमवता येतील. कारण यामध्ये पैसे टक्केवारीने नाही तर पटीने वाढतात. आज अशाच एका शेअरबद्दल माहिती पाहुयात कि जो ऐंशी पैशांत उपलब्ध होता आणि आज याचे गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत. त्या शेअरचे नाव गरवारे सिंथेटिक्सचा आहे. सध्या हा शेअर १३.६५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर आहे. मागील फक्त काही महिन्यातच या शेअरची किंमत काही पटींनी वाढली आहे.

१ लाखाचे झाले १७ लाख :- याचाच अर्थ जानेवारी महिन्यात या शेअरमध्ये केलेल्या १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज जवळपास १७ लाख रुपये झाले आहे. सहा महिन्यापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास २ लाख रुपये झाले असते. सोळा महिन्यांच्या कालावधीतच या शेअरने गुंतवणुकदारांचा पैसा सतरा पटींपेक्षा जास्त वाढवला आहे. गरवारे सिंथेटिक्सची स्थापना १९६९मध्ये झाली होती.

Advertisement

शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड सुरूच :- आज शेअर बाजाराने नवा विक्रम नोंदवत सेन्सेक्सने ५९,००० अशांचा टप्पा ओलांडला तर निफ्टीने १७,६०० अंशाचा टप्पा ओलांडला. दोन्ही निर्देशांकांची ही आतापर्यतची उच्चांकी पातळी आहे. शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी नव्या विक्रमी पातळीवर पोचले असून या तेजीमुळे अनेक कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.

बाजारातील दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर पोचले आहेत. अर्थव्यवस्थेत सकारात्मक वाढ दिसत असल्याने शेअर बाजाराच्या तेजीला वातावरण अनुकूल झालेले दिसत आहे. त्यामुळे शेअर बाजार सध्या मोठ्या तेजीत आहे. मात्र या तेजीवर आरुढ होताना गुंतवणुकदारांनी सतर्क राहण्याचीही आवश्यकता आहे. कारण चढ उतार हा बाजाराचा स्थायी भाव आहे.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker