Share Market
Share Market

MHLive24 टीम, 25 मार्च 2022 :- Share Market : काही दिवसांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये आर्थिक पडझड सुरू आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्या मधील सुरू असलेले युद्ध! रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. दरम्यान युद्धाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्यामुळे गुंतवणुकदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

देशातील सर्वात मोठी बँक SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) आपला ताळेबंद सतत मजबूत करत आहे आणि बँकेचा परतावा गुणोत्तर देखील सुधारत आहे. यामुळे बँकेच्या शेअरची किंमत 670 रुपयांच्या पुढे जाणार आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.

अंदाज काय आहे:

मोतीलाल ओसवाल यांनी एसबीआयसाठी 675 रुपयांची लक्ष्य किंमत ठेवत नोटमध्ये खरेदी रेटिंग दिली आहे. म्हणजे खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 40 टक्क्यांनी संभाव्य वाढ दर्शवते. SBI च्या शेअर्समध्ये एका वर्षाच्या कालावधीत सुमारे 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर 2022 मध्ये आतापर्यंत 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

आता काय आहे किंमत :

सध्या बीएसई निर्देशांकावर शेअरची किंमत 490 रुपयांच्या जवळ आहे. एक दिवस आधीच्या तुलनेत 0.40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्याच्या किमतीच्या आधारे 185 रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो. बाजार भांडवलाबद्दल बोलायचे तर ते 4,36,279.63 कोटी रुपये आहे.

ब्रोकरेजचे काय म्हणणे आहे:

बँक व्यवस्थापनाचे लक्ष एक मजबूत कर्ज पोर्टफोलिओ तयार करण्यावर आहे, ज्यामुळे ऑपरेटिंग कामगिरीमध्ये स्थिर बदल झाला आहे. गेल्या काही तिमाहीत मालमत्तेची गुणवत्ता सुधारली आहे. उत्तम अंडररायटिंग आणि रिकव्हरी दिसली आहे.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit