Share Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.

जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. गुरुवारी शेअर बाजारातील हाहाकार माजला असताना असे काही शेअर्स होते, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना स्थिर राहण्याची संधी दिली.

सेन्सेक्स कंपन्यांमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, टाटा स्टील, इंडसइंड बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचे शेअर्स नुकसानीसह बंद झाले, तर आयटीसी आणि डॉ रेड्डीजचे शेअर्स वधारण्यात यशस्वी झाले.

गुरुवारी लार्ज कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये, अदानी विल्मर, कॅपलिन पॉइंट, वेलस्पन कॉर्प, आयटीसी सारखे शेअर 3 ते 7.83 टक्क्यांनी वाढून बंद झाले.

कॅपलिन पॉइंटचा शेअर 7.8 टक्क्यांच्या उसळीसह 800.50 रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी, अदानी विल्मर 4.96 टक्क्यांनी वाढून 668.15 रुपयांवर पोहोचला.

वेलस्पन कॉर्प 4.09 टक्क्यांनी वाढून 208.90 रुपयांवर बंद झाला. ही आकडेवारी NSE ची आहे. त्याच वेळी, आयटीसी 3.32 टक्क्यांच्या वाढीसह 275.65 रुपयांवर बंद झाला.

गुरुवारी सेन्सेक्स 1,416.30 अंकांनी म्हणजेच 2.61 टक्क्यांनी घसरून 52,792.23 अंकांवर गेला. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान, तो एका वेळी 1,539.02 अंकांनी खाली 52,669.51 वर आला होता.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 430.90 अंकांनी म्हणजेच 2.65 टक्क्यांनी घसरून 15,809.40 वर बंद झाला. या काळात आयटीसी आणि डॉ रेड्डीजचे शेअर्स स्थिर राहिले.

गुरुवारी शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 6.71 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचा परिणाम स्थानिक बाजारावरही झाला.

बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 6,71,051.73 कोटी रुपयांनी घसरून 2,49,06,394.08 कोटी रुपयांवर आले.

कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे ​​इक्विटी रिसर्च (रिटेल) श्रीकांत चौहान म्हणाले, “जोपर्यंत परदेशी गुंतवणूकदार विक्रेते राहतात तोपर्यंत बाजाराला गती मिळणे कठीण आहे.