Share Market: सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.

जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. शेअर बाजार ही अशी जागा आहे जिथे नेहमीच धोका असतो.

पण जर तुम्ही हुशारीने गुंतवणूक केली असेल तर वाईट काळातही तुमच्या शेअरवर विश्वास ठेवावा. संयमाचे फळ गोड असते असे म्हणतात.

शेअर बाजाराच्या बाबतीत ही म्हण अगदी चपखल बसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रॅडिको खेतान. एकेकाळी 7.60 रुपयांच्या पातळीवर विकल्या जाणाऱ्या या कंपनीच्या शेअरची किंमत 826 रुपयांपर्यंत वाढली. म्हणजेच या कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 10,700% ची उसळी दिसून आली.

कंपनीचा स्टॉक इतिहास काय आहे? :-  यावर्षी शेअर बाजारात अस्थिरतेचा काळ आहे, या कठीण काळात या शेअरवरही वाईट परिणाम झाला आहे. या वर्षी आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये 35% घसरण झाली आहे.

गेल्या 6 महिन्यांवर नजर टाकली असता कंपनीच्या शेअरच्या किमतीत 27% वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या एक वर्षाबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या शेअरची किंमत 610 रुपयांच्या पातळीवरून 826 रुपयांवर पोहोचली आहे.

त्याच वेळी, पाच वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 123 रुपये होती. म्हणजेच या पाच वर्षांत कंपनीच्या शेअरची किंमत 560% वाढली. 20 जून 2003 रोजी NSE मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत 7.62 रुपये होती. जे 27 मे 2022 रोजी 826 रुपये झाले.

किती परतावा :- या वर्षाच्या सुरुवातीला कोणी एक लाख गुंतवले असेल तर आज ते 65,000 पर्यंत खाली आले आहे. पण 6 महिन्यांपूर्वी गुंतवलेले 1 लाख आज 1,35,000 पर्यंत वाढले आहेत.

तर पाच वर्षांपूर्वी केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक 6.60 लाख रुपये झाली आहे. जेव्हा या शेअरची किंमत 7.62 रुपये होती, तेव्हा ज्या गुंतवणूकदाराने एक लाख रुपये गुंतवले असते, तो आज करोडपती झाला असता. आज 19 वर्षांनंतर त्या गुंतवणूकदाराचा 1 लाख रुपयांचा परतावा 1.08 कोटी रुपये झाला आहे.