चॉकलेट ऐवजी घेतला असता त्या किमतीचा ‘हा’ शेअर तर आज मिळाले असते करोडो

MHLive24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- आर्थिक सुबत्ता असावी, भरपूर पैसा असावा, श्रीमंत व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी सर्वजण आयुष्यभर भरपूर मेहनतदेखील करतात. मात्र फक्त परिश्रम करून किंवा चांगला पगार असलेली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्य येणार नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची ठरते.(Share Market)

यासाठी पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी आणि काळाच्या ओघात जास्त रिटर्न देणारी असावी. यासाठी शेअरमार्केट उपयुक्त ठरेल. ज्यांमध्ये रिस्क घेण्याची क्षमता आहे त्यांना नक्कीच यात गुंतवणूक करून पैसे कमवता येतील. कारण यामध्ये पैसे टक्केवारीने नाही तर पटीने वाढतात.

आज अशाच एका शेअरबद्दल माहिती पाहुयात कि जो पाच रुपयांत उपलब्ध होता आणि आज याचे गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत. त्या शेअरचे नाव आहे गीता रिन्यूएबल एनर्जी. गेल्या वर्षभरात Gita Renewable Energy कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 4130 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत.

Advertisement

गेल्यावर्षी 13 ऑक्टोबर 2020 रोजी या समभागाची किंमत 5.52 रुपये इतकी होती. 14 ऑक्टोबर 2021 रोजी याच समभागाची किंमत 233.50 रुपये नोंदवण्यात आली. तुम्ही सहा महिन्यांपूर्वी Gita Renewable Energy चे एक लाख रुपयांचे शेअर्स विकत घेतले असतील तर आता त्याचे मूल्य साधारण 7.95 लाख रुपये इतके झाले आहे.

गुंतवणूक करावी का ?

गेल्या महिनाभरात Gita Renewable Energy च्या समभागाची किंमत जवळपास निम्म्याने घसरली आहे. ही किंमत इतक्या झपाट्याने घसरत होती की अनेकदा या समभागासाठी लोवर सर्किट लागले. त्यामुळे महिनाभरापूर्वी या कंपनीचे समभाग खरेदी केलेल्या गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. सध्या समभागाची किंमत सार्वकालिक उच्चांकापेक्षा बरीच खाली असली तरी यामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

Advertisement

गरवारे सिंथेटिक्स या शेअर्सने देखील मालामाल केले

हा शेअर ऐंशी पैशांत उपलब्ध होता आणि आज याचे गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत. त्या शेअरचे नाव गरवारे सिंथेटिक्सचा आहे. सध्या हा शेअर १३.६५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर आहे. मागील फक्त काही महिन्यातच या शेअरची किंमत काही पटींनी वाढली आहे.

१ लाखाचे झाले १७ लाख

Advertisement

याचाच अर्थ जानेवारी महिन्यात या शेअरमध्ये केलेल्या १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज जवळपास १७ लाख रुपये झाले आहे. सहा महिन्यापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास २ लाख रुपये झाले असते. सोळा महिन्यांच्या कालावधीतच या शेअरने गुंतवणुकदारांचा पैसा सतरा पटींपेक्षा जास्त वाढवला आहे. गरवारे सिंथेटिक्सची स्थापना १९६९मध्ये झाली होती.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker