Share Market
Share Market

MHLive24 टीम, 24 मार्च 2022 :- Share Market : काही दिवसांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये आर्थिक पडझड सुरू आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्या मधील सुरू असलेले युद्ध! रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. दरम्यान अशा घसरत्या बाजारातही अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. असाच एक स्टॉक फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सचा आहे.

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या शेअर्सने जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 35,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. Flomik Global Logistics चे शेअर्स अवघ्या 3 वर्षात 35 पैशांवरून 128 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 216.30 रुपये आहे. त्याच वेळी, फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा नीचांक 4.74 रुपये आहे.

ज्यांनी 1 लाख रुपये गुंतवले असतील, त्यांची रक्कम आता इतकी होईल

28 मार्च 2019 रोजी Flomik Global Logistics चे शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 35 पैशांच्या पातळीवर होते. 24 मार्च 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 128 रुपयांवर बंद झाले.

कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 3 वर्षांत गुंतवणूकदारांना जवळपास 36,470 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने तीन वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि आपली गुंतवणूक चालू ठेवू दिली असेल तर सध्या ही रक्कम 3.6 कोटी रुपये झाली असती.

कंपनीच्या शेअर्सने 1 वर्षात असा परतावा दिला

Flomik Global Logistics चे शेअर्स 26 मार्च 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 4.92 रुपयांच्या पातळीवर होते. 24 मार्च 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 128 रुपयांवर बंद झाले.

जर 1 वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीने कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 28 लाख रुपये झाले असते. म्हणजेच 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 27 लाखांचा थेट फायदा झाला असता. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 1 वर्षात 2500 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit