Share Market Tips
Share Market Tips

Share Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.

जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. कोहिनूर फूड्स लिमिटेडचा शेअर गेल्या एका महिन्यापासून जबरदस्त कामगिरी करत आहे.

गेल्या एक महिन्यापासून कंपनीचे शेअर्स सातत्याने वरच्या सर्किटला धडकत आहेत. कोहिनूर फूड्सचे शेअर्स शुक्रवारी बीएसईवर 5% वाढून 50.55 रुपयांवर पोहोचले.

एका महिन्यात 162% परतावा :- कोहिनूर फूड्स लिमिटेडच्या शेअरने एकाच महिन्यात 161.24% चा परतावा दिला आहे. महिन्याभरापूर्वी या शेअरची किंमत फक्त 19.35 रुपये प्रति शेअर होती,

ती आता 50.55 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदाराने महिन्याभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले होते, त्याला आजमितीला 2.61 लाख रुपये नफा झाला असेल.

खरे तर या दोन कंपन्यांचे शेअर्स वाढण्याचे कारण म्हणजे अदानी कंपनी. खरं तर, अलीकडेच अदानी समूहाची खाद्य तेल कंपनी अदानी विल्मरने अमेरिकन कंपनी मॅककॉर्मिककडून पॅकेज्ड फूड ब्रँड कोहिनूर खरेदी करण्याची घोषणा केली आहे.

प्रीमियम बासमती तांदूळ ब्रँड व्यतिरिक्त, डीलमध्ये चारमिनार आणि ट्रॉफी सारख्या ब्रँडचा देखील समावेश आहे, ज्याची किंमत सुमारे 115 कोटी रुपये आहे.

कंपनीचा व्यवसाय :- कोहिनूर फूड्स हा खाद्यपदार्थांचे उत्पादन, व्यापार आणि विपणन या व्यवसायात गुंतलेला आहे. कंपनी जगभरातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुरवठा साखळी उपलब्ध करून देत आहे.

कोहिनूर फूड्समध्ये बासमती तांदळाचे प्रकार, रेडी टू इट करी, रेडीमेड ग्रेव्ही, कुकिंग पेस्ट, चटण्या, मसाले आणि मसाला ते फ्रोझन ब्रेड्स, स्नॅक्स, आरोग्यदायी तृणधान्ये आणि खाद्यतेल असे अनेक व्यवसाय आहेत.