Share Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.

जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. अशातच सॅनिटरीवेअर इंडस्ट्रीशी निगडीत एका कंपनीच्या शेअर्सचे रुपांतर कोटींमध्ये झाले आहे.

कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त परतावा दिला आहे. ही कंपनी Cera Sanitaryware आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीचे शेअर्स 4 रुपयांवरून 4,000 रुपयांवर गेले आहेत.

या कालावधीत कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना 95,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 3,518.60 रुपये आहे.

23 मे 2003 रोजी सेरा सॅनिटरीवेअरचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 4 रुपयांच्या पातळीवर होते . 20 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 4,025 रुपयांवर बंद झाले.

कंपनीच्या समभागांनी 95,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 23 मे 2003 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या ही रक्कम 10 कोटींपेक्षा जास्त झाली असती.

सेरा सॅनिटरीवेअर शेअर्स 6,430.45 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. 2 एप्रिल 2009 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर सेरा सॅनिटरीवेअरचे शेअर्स 26 रुपयांपासून 4,000 रुपयांपर्यंत पोहोचले होते.

20 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 4,025 रुपयांवर बंद झाले. जर एखाद्या व्यक्तीने 2 एप्रिल 2009 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 1.54 कोटी रुपयांच्या जवळपास गेले असते.

Cera Sanitaryware च्या शेअर्सनी यावर्षी आतापर्यंत 19 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 6 महिन्यांत 21 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.