शरद पवारांनी ‘एनडीए’त यावं आणि सत्तेतही वाटा घ्यावा

Mhlive24 टीम, 28 सप्टेंबर 2020 :-  शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे.

दोनच दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली. त्यामुळे शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा सुरू झाली.

त्या पार्श्वभूमीवर आठवलेंनी शिवसेनेला साद घातली आहे. विशेष म्हणजे आठवलेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही एनडीएसोबत येण्याचं आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शरद पवार यांनी एनडीएत यावं.

Advertisement

शरद पवार आले तर केंद्रातील सत्तेत वाटा मिळेल, असे आठवले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.  नुकतीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

या भेटीचा संदर्भ देत आठवले यांनी, भाजपशी युती झाल्यास शिवसेनेला फायदा होईल, असा दावा केला आहे. ५०-५० फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेने भाजपसोबत सरकार बनवावं. शिवसेनेने भाजपसोबत रिपाईंला देखील सोबत घ्यावं, असे आठवले यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यावरही आठवलेंनी तोडगा सुचवला. ‘उद्धव ठाकरे जवळपास एका वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणखी एखादं वर्ष मुख्यमंत्री राहावं.

Advertisement

त्यानंतरची तीन वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील,’ असा पर्याय आठवलेंनी सुचवला. ‘भाजपसोबत आल्यावर सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होईल. त्यांना केंद्रातही एक-दोन मंत्रिपदं मिळतील,’ असं आठवले म्हणाले.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker