जांभुळवाड़ी तलावातील सात टन मासे मृत

MHLive24 टीम, 25 जुलै 2021 :- दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आंबेगाव जांभुळवाडी परिसरातील तलावाच्या काठावर साधारण पाच ते सात टन मासे मृत अवस्थेत पडलेले दिसले. यामध्ये, लहान माशांपासून पंधरा किलोपर्यंतच्या माशांचा समावेश आहे. या मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

तलावात अतिक्रमणे :- जांभुळवाडी तलाव हा ९७ एकर क्षेत्रात आहे; परंतु सद्यस्थिती पाहता तलावाचे क्षेत्रात पाच ते सात एकरांची घट झालेली दिसून येते. तलावात अतिक्रमणे वाढत असताना पाटबंधारे खाते मात्र डोळ्यावर गेंड्याची कातडी ओढून बसलेले दिसते आहे. शिवाय आंबेगाव खुर्द, जांभुळवाडी परिसर झपाट्याने विकसित होत असल्याने तलाव परिसरात दाट लोकवस्ती झाली आहे.

सदनिकांचे सांडपाणी तलावात :- तलावाच्या जवळ मोठ मोठ्या सदनिका उभारल्या गेल्या आहेत. या सदनिकांच्या सांडपाण्याला महापालिकेकडून सांडपाणी वाहिनी अद्याप टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे, शनिनगर चौक ते जांभुळवाडी दरीपूल दरम्यान असणाऱ्या टोलेजंग सदनिकांचे सांडपाणी तलावात सोडले जाते आहे. या सांडपाण्यामुळे तलावातील पाणी दूषित होऊन, पाण्याचा रंग हिरवट झाला आहे.

Advertisement

सांडपाणी वाहिनी टाकण्याबाबत महापालिका व पाटबंधारे विभाग यांच्यामधील प्रश्न अजूनही न सुटल्याने सांडपाणी वाहिनी टाकण्यात आलेली नसली, तरी पाटबंधारे खात्याकडून या सांडपाणी सोडणाऱ्या एकही सोसायटीवर कारवाई केल्याची नोंद नाही. पाटबंधारे विभागाच्या या औदासिन्यपूर्ण धोरणामुळे मात्र जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

नागरिकांच्या आरोग्याला धोका :- तलावातील मासेमारी मच्छीमारांकडून चालू आहे.या दूषित पाण्यातील मासे बाजारात विक्रीसाठी नेले जात आहेत. यापासून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.तलावातील ही मच्छीमारी पाटबंधारे विभागाकडून लवकरात लवकर बंद करून, तलाव संवर्धन करणे गरजेचे आहे.

दूषित पाण्याने तलावातील मासे मृत होत असल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी अज्ञात नागरिकांकडून रात्रीच्यावेळी मासेमारी करण्यासाठी तलावात पावडर टाकण्यात येत असल्याची छुपी चर्चा नागरिक करत आहेत. या पावडरीमुळे मासे भुलून मरतात व आयती शिकार होते. त्यामुळे मासे नेमके कशाने मरतात याबद्दल शंका आहे. शिवाय काही नागरिक तलावातील मृत मासे बाजारात व घरीसुद्धा घेऊन जात आहेत.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker