टोळीहल्ल्यात सात जण गंभीर जखमी

MHLive24 टीम, 27 जुलै 2021 :- मुंबईतच्या वांद्रे पश्चिम भागातील जेजे कॉलनी परिसरात एका कट्ट्यावर 8 ते 10 जण बसले होते. त्यावेळी अचानक बाईकवरुन 20 ते 25 लोकांची टोळी आली. त्यांनी बसलेल्या लोकांवर तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवला. या हल्ल्यात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.

तुफान राडा :- मुंबईत वांद्रे पश्चिम भागात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोन गटांत तुफान राडा झाला. 8 ते 10 लोकांवर तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला आहे.

या हल्ल्यात 7 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जवळच्याच भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली आहे, तर अन्य आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

Advertisement

वर्दळीत चिकन दुकानदाराचा कोयत्याने दोघांवर हल्ला :- वडाळा नाका परिसरात दोघा भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे शेजारील चिकनच्या दुकानदारानेच हा हल्ला केला आहे. या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर दुकानदार हल्ला करून फरार झाला आहे. जखमी भावांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संबंधित घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

चिकन दुकानदाराने हल्ला का केला ? :- वडाळा नाका येथे हल्लेखोरांचं चिकनचं दुकान आहे. या दुकानाच्या शेजारी राहणाऱ्या दोघा भावांनी चिकन दुकानदाराची तक्रार पोलिसात केली होती. याच गोष्टीच्या रागातून चिकन दुकानदाराने दुकानात असलेल्या कोयत्याने दोघा भावांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अमीर खान आणि मझर खान हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker