Update for LIC Policyholder
Update for LIC Policyholder

Lic Policy : बचत म्हणून आपण गुंतवणूक करत असतो. अशावेळी आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. अशा अनेक पर्यायमध्ये बहुतेक लोक LIC ची निवड करतात.

LIC पॉलिसी आजही अनेक लोकांसाठी सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. अशातच भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक विशेष योजना तयार केली आहे.

महिलांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या या योजनेचे नाव आहे LIC आधारशिला योजना. 8 ते 55 वयोगटातील महिला एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

या योजनेत तुम्ही दररोज 30 रुपये जमा केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 4 लाख रुपये मिळू शकतात. चला जाणून घेऊया या योजनेबद्दल,

लाभ घेण्याची अट

LIC ची आधारशिला योजना सुरक्षा आणि बचत दोन्ही देते. ज्यांचे आधार कार्ड बनले आहे. अशा महिलाच याचा लाभ घेऊ शकतात.

एलआयसीची ही योजना पॉलिसीधारक आणि त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत करते. पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, पॉलिसीधारकाला पैसे मिळतात..

LIC आधार शिला योजनेंतर्गत, मूळ विमा रक्कम

किमान रु 75000 आणि कमाल रु. 3 लाख आहे. पॉलिसीचा कालावधी किमान 10 वर्षे आणि कमाल 20 वर्षे आहे.

8 ते 55 वर्षे वयोगटातील महिला एलआयसीच्या योजनेत गुंतवणूक करू शकते आणि कमाल परिपक्वता वय 70 वर्षे आहे. योजनेतील प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर भरले जातात.

पूर्ण गणित शिका

समजा तुम्ही 31 वर्षांचे असाल आणि 20 वर्षांसाठी दररोज 230 रुपये जमा केले तर पहिल्या वर्षी तुम्हाला 10,959 रुपये मिळतील. 4.5 टक्के कर लागणार आहे. पुढील वर्षी तुम्हाला 10,723 रुपये द्यावे लागतील.

हे प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर जमा केले जाऊ शकतात. अशा प्रकारे तुम्हाला 20 वर्षांत 2,14,696 रुपये जमा करावे लागतील आणि परिपक्वतेच्या वेळी 3,97,000 रुपये मिळतील.