Sensex reaches 60,000 : रेकॉर्डब्रेक : Sensex ने 60 हजारांचा टप्पा गाठला ! गुंतवणूकदारांची जोरदार कमाई

MHLive24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- आज मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने प्रथमच ६० हजार अंकाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. या तेजीतून जोरदार कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आज बाजारात अक्षरश: दिवाळी साजरी केली.( Sensex reaches 60,000)

आज शुक्रवारी बाजार सुरु होताच सेन्सेक्सने ३६६ अंकाची झेप घेत ६०२५१ अंकाची विक्रमी पातळी गाठली. निफ्टी देखील १०९ अंकांच्या वाढीसह १७९३१ अंकापर्यंत पोहोचला आहे.

आधी जानेवारी महिन्यात सेन्सेक्सने ५० हजारांचा टप्पा ओलांडला होता. निफ्टीदेखील नवे विक्रम करत असल्याचे शुक्रवारी दिसून आले. कोणत्याही क्षणी निफ्टी १८ हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.

Advertisement

निफ्टी मिड कॅप, निफ्टी बँक, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसमध्ये वाढ झाली आहे. निफ्टीच्या ५० पैकी ३८ शेअर्समध्ये नफा दिसून येत आहे. त्याचबरोबर १२ समभागांमध्ये घसरण आहे

गेल्या काही महिन्यांत भारतीय शेअर बाजारात सतत वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत. गेल्या काही महिन्यांत भारतीय बाजारात विदेशी भांडवलाची आवक अपेक्षेपेक्षा जास्त झाली आहे.

या व्यतिरिक्त, देशाच्या अर्थव्यवस्थेला लसीकरणाचा लाभ मिळत आहे आणि करोनाच्या प्रकरणामधील घट तसेच अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची कारणे आहेत.

Advertisement

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही, यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये गुरुवारी सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले.

अमेरिकन सरकार तिथे अद्याप मदत पॅकेज मागे घेण्याची पावले उचलणार नाही. तिकडे चीनच्या मध्यवर्ती बँकेने बँकिंग व्यवस्थेत रोख रक्कम गुंतवून Evergrande मुद्द्यावर थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker