Tax benefits to senior citizens : ज्येष्ठ नागरिकांना मिळतात ‘हे’ टॅक्स बेनिफिट; तुम्हालाही होईल खूप फायदा

MHLive24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- विशिष्ट उत्पन्न मर्यादा असणाऱ्याना टॅक्स द्यावा लागतो. परंतु केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांना आयकरात अनेक सवलती देते. ज्यामध्ये वार्षिक उत्पन्नावर आयकर सवलत मिळते, तसेच इतर मार्गांच्या अवलंबनाने डिडक्शनचा लाभही मिळतो.(Tax benefits to senior citizens)

यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्नाचे स्रोत खूपच कमी असतात आणि त्यांच्या औषधोपचारावर होणारा खर्च खूप जास्त असतो. त्यामुळे सरकार 60 ते 80 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना आयकरात सूट देते.

तर 80 वर्षांवरील व्यक्तींना सुपर ज्येष्ठ नागरिक म्हटले जाते. ज्यांना ज्येष्ठ नागरिकांपेक्षा अधिक लाभ मिळतात. तुमच्या घरातही ज्येष्ठ नागरिक किंवा अति ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना आयकरात कसा फायदा मिळू शकतो ते जाणून घ्या.

Advertisement

आयकर सवलत मर्यादा – सध्या 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना वार्षिक 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागत नाही. त्याच वेळी, ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 लाख रुपये आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 लाख रुपये आहे. याचा सरळ अर्थ असा की, अशा उत्पन्नावर वार्षिक कोणताही कर भरावा लागत नाही.

गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर सवलत – ज्येष्ठ नागरिक मुदत ठेवी करून त्यांच्यातुन मिळणाऱ्या व्याजातून त्यांचा खर्च भागवण्यासाठी त्यांची जीवन बचत करतात. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक वर्षात 50 हजार रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 80 टीटीबी अंतर्गत कर सूट मिळते.

वैद्यकीय विम्याच्या प्रीमियमवर डिडक्शन – ज्येष्ठ नागरिकांना वर्षभरात रु. 50,000 पर्यंतच्या वैद्यकीय विम्यावरील कपातीचा लाभ मिळू शकतो. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आयकर कायद्याच्या कलम 80D नुसार सूट मिळते.

Advertisement

वैद्यकीय खर्चावर कर सवलत – आपल्या सर्वांना माहित आहे की वयानुसार औषधांवरील खर्च वाढते, म्हणूनच सरकारने ज्येष्ठ नागरिकांना आयकरात अधिक सूट दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी वर्षभरात केलेल्या वैद्यकीय खर्चावरही कर सूट मिळू शकते. आयकर कायद्याच्या कलम 80DDB अंतर्गत, ज्येष्ठ नागरिक 1 लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय खर्चावर डिडक्शनचा फायदा मिळवू शकतो.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker