शाळांच्या परीक्षा होतात, मग एमपीएससीच्या का नाहीत?

MHLive24 टीम, 28 जुलै 2021 :- पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षांना कोरोना आडवा येत नही. जेईई मेनच्या परीक्षा होतात. अकरावीच्या प्रवेश पूर्व परीक्षा होतात, मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेलाच का अडचण येते, असा सवाल स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी केला. त्यांनी संताप व्यक्त केला.

परीक्षांची तारीख जाहीर करण्याची मागणी :- राज्यातील कोरोना परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याने शालेय शिक्षण विभागातर्फे विविध परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) / राज्य कर निरीक्षक (एसटीआय) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) पदासाठी घेतल्या जाणाऱ्या संयुक्त परीक्षेची (कंबाईन) तारीख आता आयोगाने जाहीर करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

विद्यार्थी नैराश्यात :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्य शासनाने शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा पुढे ढकलल्या. सातत्याने परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्याने विद्यार्थी नैराश्यात आहेत. परीक्षांचा तारखा जाहीर होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

Advertisement

चार लाख विद्यार्थी परीक्षेच्या प्रतीक्षेत :- एमपीएससीतर्फे २०१९ मध्ये संयुक्त परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर २०२० मध्ये घेतली जाणारी परीक्षा सहा वेळा पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून ३ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून सर्व विद्यार्थी परीक्षा केव्हा होणार या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता परीक्षेची तारीख लवकर जाहीर करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे महेश धरबुडे यांनी केली आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker