केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात; `या` महिन्यात येणार मेड इन इंडिया कोरोना लस

Mhlive24 टीम, 21 ऑगस्ट 2020 : देशात कोरोना पेशंटची वाढती आकडेवारी सर्वाना चिंतेत टाकणारी आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असलेला देश आहे. 

भारताच्या कोरोनावरील लशीकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत. ही लस कधी मिळणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशवासियांना गुड न्युज दिली आहे.

यापूर्वी रशिया आणि चीनने कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला आहे. रशियाने लसीचे उत्पादनही सुरु केले आहे. मात्र, रशियाच्या कोरोना लसीवर जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक देशांनी आक्षेप घेतला आहे. त्या लसीबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

Advertisement

या वर्षाअखेरपर्यंतच मेड इन इंडिया कोरोना लस उपलब्ध होईल, असा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. भारताची कोरोना लस ह्युमन ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. आता अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ही लस कधी मिळणार याची माहिती दिली आहे.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी भारतातील कोरोना लशीबाबत माहिती दिली आहे. डॉ. हर्षवर्धन म्हणाले, “जगभरात कोरोना लशीचं ट्रायल फास्ट ट्रॅक केलं जातं आहे. भारतातील लशींचं ट्रायल 2020 वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे.

2021 च्या पहिल्या तिमाही लशीचा वापर करण्यासाठी आपण तयार असू शकतो” “भारत बायोटेकने बनवलेली कोवॅक्सिन वर्षाच्या शेवटपर्यंत उपलब्ध होईल. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने करार केला आहे.

Advertisement

त्यामुळे ही लस यशस्वी झाली तर भारताला स्वस्त दरात हे औषध उपलब्ध करून दिलं जाईल. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आधीच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीचं उत्पादन करत आहे, जेणेकरून कमीत कमी वेळेत ही लस बाजारात उपलब्ध करून देता येईल.

भार बायोटेकप्रमाणे सीरम इन्स्टिट्युसहदेखील असाच करार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे”, असंही ते म्हणाले. लशी बाजारात आणण्यासाठी कमीत कमी एक महिना आणखी लागेल. लस उपलब्ध होताच सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाईल,

त्यानंतर वयस्कर व्यक्त आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांना दिली जाईल. त्यानंतर उपलब्ध डोसनुसार सर्वांचं लसीकरण केलं जाईल, असं डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker