‘हनुमान चलिसा म्हणा आणि कोरोनाला पळवा’,साध्वी प्रज्ञा म्हणतात…

MhLive24 टीम , 26 जुलै  2020 :- भाजपच्या भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. बऱ्याचदा त्या वादाच्या भोवऱ्यातही सापडल्या आहेत. आता त्यांनी कोरोनाबाबत अजब दावा केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी नागरिकांनी 5 ऑगस्टपर्यंत दररोज पाच वेळा हनुमान चलिसा म्हणा याने कोरोनाची ही साथ संपेल व लोकांना चांगले आरोग्य मिळेल.

या त्यांच्या वक्तव्यावर पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. मागेही त्यांनी त्यांच्या वक्तव्यामुळे वाद ओढवून घेतला होता. आता रामजन्म भूमीच्या ५ ऑगस्टला भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे.

Advertisement

त्याला अनुष्ठानघून त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पुढे त्या म्हणाल्या, 25 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत दररोज आपल्या घरी पाच वेळा हनुमान चलिसा म्हणूया. तुमचे हे व्रत 5 ऑगस्टला घरात दिवे लावून व भगवान रामाची आरती करून संपन्न करा.

जेव्हा सर्व हिंदू एकत्र येऊन घरात हनुमान चलिसा म्हणतील तेव्हा नक्कीच आपण कोरोनामुक्त होऊ. हे व्रत तुमची भगवान रामाला केलेली प्रार्थनाच आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker