बाळाला वाचवलं; पण धावपटून पाय गमावला, हवी मदत

MHLive24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- दरड कोसळताना दोन महिन्यांच्या बाळाला वाचवण्याच्या प्रयत्नात अंगावर भिंत कोसळल्याने चिमुरडी धावपटू गंभीर जखमी झाली. या दुखापतग्रस्त विद्यार्थिनीवर शस्त्रक्रियेनंतर गुडघ्यापासून खाली पाय कापण्याची वेळ आली. त्यामुळे तिच्या पुढील उपचारासाठी आणि कृत्रिम पाय बसवण्यासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं? :- रायगड जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या. या वेळी पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात 14 वर्षांच्या साक्षी दाभेकर हिने धिटाईने दोन महिन्यांच्या मुलाचे प्राण वाचवले; मात्र भिंत अंगावर कोसळल्यामुळे साक्षी जबर जखमी झाली.

पाय गुडघ्यापासून खाली कापला :- साक्षीला तातडीने रायगडहून मुंबईत हलवण्यात आले. ‘केईएम’ रुग्णालयामध्ये तिच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या वेळी दुर्दैवाने तिचा पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला. तालुका स्तरावरील धावपटू विद्यार्थिनीचा पाय कापावा लागल्याने तिच्या भवितव्यावर सावट आलं.

Advertisement

उपचारासाठी मदतीची कुटुंबियांची मागणी :- या मुलीची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी लाखो रुपयांच्या खर्चाचं आव्हान कुटुंबीयांसमोर उभं राहिलं आहे. सरकारने तिच्या या शौर्याची दखल घ्यावी आणि तिला पुढील उपचारासाठी मदत करावी अशी कुटुंबीयांची मागणी आहे.

कृत्रिम पाय बसवण्यासाठी मदत करा :- 14 वर्षांची साक्षी दाभेकर धावपटू आहे. कबड्डी आणि खो खो हे क्रीडा प्रकार ती तालुका स्तरावर खेळते; पण आता तिला पाय गमवावा लागला. लेकीची परिस्थिती बघून त्यांना अश्रू अनावर होतात. त्यामुळे साक्षीला कृत्रिम पाय बसवण्यासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन दानशूरांना केलं जात आहे.

साक्षीला मदत करण्यासाठी बँक तपशील 

Advertisement

नावः प्रकाश दाभेकर

बँक आॅफ इंडिया, पोलादपूर शाखा

खाते क्रमांक 120310510002839

Advertisement

आयएफएससी कोड बीकेआयडी 0001203

एमआयसीआरः 402013520

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker