Salary Increase : खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 95,000 रुपयांपर्यंत वाढणार, पाहा कॅल्क्युलेशन

MHLive24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- केंद्रीय कर्मचारी पुन्हा एकदा निहाल झाले आहेत. 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 28% महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांना महागाई राहत (DR) 28% आधीच मिळू लागली आहे.(Salary Increase )

आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी देत केंद्र सरकारने डीए 28 टक्क्यांवरून 31 टक्के केला आहे. 31% DA मुळे तुमचा पगार किती वाढेल ते जाणून घ्या 

पे ग्रेडनुसार पगार वाढ

Advertisement

केंद्र सरकारने पुन्हा कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये 3% ने वाढ केली आहे, आता केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 31% दराने DA आणि DR दिला जाईल. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांच्या मूळ वेतन आणि श्रेणीनुसार पगारवाढीची कल्पना येऊ शकते.

31% नुसार DA वर कॅल्क्युलेशन

आता 3% महागाई भत्ता वाढल्याने एकूण DA 31% होईल. 7व्या वेतन आयोगाच्या मॅट्रिक्सनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या लेव्हल-1 ची सैलरी रेंज 18,000 रुपये ते 56900 रुपये आहे. आता 18,000 रुपयांच्या मूळ पगारावर एकूण वार्षिक महागाई भत्ता 66,960 रुपये होईल. मात्र या फरकाबाबत बोलायचे झाले तर पगारातील वार्षिक वाढ 30,240 रुपयांनी होत आहे.

Advertisement

न्यूनतम बेसिक सॅलरीवर कॅल्क्युलेशन

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन रु. 18,000
2. नवीन महागाई भत्ता (31%) रु.5580/महिना
3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (17%) रु.3060/महिना
4. किती महागाई भत्ता वाढला 5580-3060 = रु.2520/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 2520X12 = रु 30,240रुपये

मॅक्सिमम बेसिक स्लरीवर कॅल्क्युलेशन

Advertisement

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन 56900 रुपये
2. नवीन महागाई भत्ता (31%) रु 17639/महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (17%) रु.9673/महिना
4. किती महागाई भत्ता वाढला 17639-9673 = रु 7966/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 7966X12 = रु 95, 592रुपये

31% महागाई भत्त्यानुसार, 56900 रुपयांच्या मूळ पगारावर एकूण वार्षिक महागाई भत्ता 211,668 रुपये होईल. पण फरकाबद्दल बोलायचे झाले तर पगारात वार्षिक 95,592 रुपयांची वाढ होत आहे.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker