Sai Mandir Close : वर्षाच्या शेवटी ‘या काळात’ साईमंदिर दर्शनासाठी बंद!

MHLive24 टीम, 28 डिसेंबर 2021 :- राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या दि.२४ डिसेंबर २०२१ रोजीच्या कोविड-१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार दि.२५ डिसेंबर २०२१ रोजीपासून रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी लागू केल्यामुळे चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.(Sai Mandir Close)

पत्रकात बानायत म्हणाल्या, राज्य शासनाने दि. ७ ऑक्टोंबर २०२१ पासून काही अटी-शर्तीवर धार्मि­क स्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले होते.

त्यानुसार श्री साईबाबांचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आलेले होते; परंतु सध्या देशात व राज्यात कोरोना विषाणुचा ओमायक्रॉन या व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेता पुन्हा राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत.

Advertisement

त्यानुसार दि. २५ डिसेंबर २०२१ रोजी पासुन रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी लागु केलेली आहे. त्याअनुषंगाने संस्थानच्या वतीने या वेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शन व आरतीसाठी भाविकांना बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker