सेवानिवृत्त अधिकाऱ्यांने गोळी झाडून केली आत्महत्या

Mhlive24 टीम, 27 सप्टेंबर 2020 :- प्रादेशिक परिवहन विभागातुन कार्यमुक्त झालेल्या सेवानिवृत्त अधिकारी यांनी ठाण्यात राहत्या घरी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

या अत्म्हत्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच राबोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. निवृत्त अधिकारी मोहम्मद सादिक शेख यांनी वैफल्यग्रस्त असून, दारूचे व्यसन आणि मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होते.

यामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर याबाबत अधिक तपास राबोडी पोलीस करीत आहेत. मृतक प्रादेशिक परिवहन निवृत्त अधिकारी मोहम्मद सादिक शेख हे ठाण्याच्या केसलमील परिसरातील विकास कॉम्प्लेक्स मध्ये राहत होते.

Advertisement

मोहम्मद साजिद शेख हे प्रादेशिक परिवहन विभागात अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांना दारूचे व्यसन होते. त्यांना पत्नी एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. यातील दोन मुली या विवाहित असून मुलगा अभियंता आहे. तो त्यांच्या सोबत ठाण्यात केसलमील येथे राहत होता.

तर शेख यांची पत्नी एक वर्षांपासून नेरळ येथे वास्तव्यास होती. शेख यांची एक मुलगी अभियंता असून दुसरी मुलगी हि डॉक्टर आहे. दरम्यान अधिकारी असलेल्या शेख याना दारूचे व्यसन जडले होते. दरम्यान वैफल्यग्रस्त

आणि नैराश्येतून शेख यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज राबोडी पोलीस व्यक्त करीत आहेत. दरम्यान राबोडी पोलिसांनी घटनास्थळावरून शेख यांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे. अधिक तपास राबोडी पोलीस करीत आहेत.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker