पुण्यासह ११ जिल्ह्यांत निर्बंध आणखी कडक करणार

MHLive24 टीम, 30 जुलै 2021 :- राज्यातील २५ जिल्ह्यातील कोरोनाविषयक निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत, तर पुणे, नगरसह ११ जिल्ह्यातील कोरोनाला अटकाव झाला नाही, तर निर्बंध आणखी कडक करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. अर्थात याबाबतचा आदेश मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतरच निघणार आहे.

एक-दोन दिवसांत निर्णय :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक पार पडली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील टाळेबंदीच्या शिथिलीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले, की टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाने चर्चा करून काही बाबींची शिफारस मुख्यमंत्र्याना केली आहे. त्यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन-तीन दिवसांत घेतील.

काय आहेत शिफारसी ? :- पॉझिटीव्हीटी रेट कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये नियमांत शिथिलता आणली जाणार आहे. यानुसार, २५ जिल्ह्यांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
  •  दुकानं, हॉटेल्स, मंदिरे, जीम्स सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा
  • दुकाने शनिवारीसुद्धा चार वाजेपर्यंत चालू राहतील, रविवारी बंद राहतील
  • शॉप्स, हॉटेल्स, सिनेमा ५० टक्के क्षमतेने सुरू, याठिकाणी दोन डोस पूर्ण झालेले कर्मचारी हवेत
  • लग्न समारंभाबाबतच्या निर्णयातही थोडीफार शिथिलता येईल.

लोकलबाबतचा निर्णय :- लोकल सुरू करण्याची मागणी होत आहे. दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल सुरू करायची का, याबाबत रेल्वे अथॉरिटीशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

हे ११ जिल्हे तिस-या गटातच राहणार :- पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधूदूर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड, नगर या जिल्ह्यात शिथिलता आणली जाणार नाही. या ठिकाणचे निर्बंध शिथील होणार नाहीत. परिस्थितीनुसार, स्थानिक प्रशासनाच्या सहका-यांच्या मदतीतून आणखी कडक होतील. उर्वरित जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील केले जाणार आहेत.

पोल्ट्रीसाठी वाहतुकीत शिथिलता हवी :- नवापूर शहरातील कुक्कुटपालन व्यवसाय कोरोनाच्या विळख्यात अडकला असून संचारबंदीमुळे अंडे वाहतुकीला येणाऱ्या अडचणीमुळे व्यवसाय ठप्प झाला आहे. केंद्र व राज्य शासन वाहतुकीबाबत वेगवेगळी धोरण राबवतात.

Advertisement

जिल्हा व तालुका प्रशासन वेगळे नियम लावतात. अत्यावश्यक वस्तू वाहतुकीबाबत देशात एक कलमी कार्यक्रम राबवला. तर व्यवस्था कोलमडणार नाही असे नवापूर पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरीफभाई बलेसरीया यांनी म्हटले आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker