मेडिकलसाठी ईडबल्यूएस, ओबीसींना आरक्षण

MHLive24 टीम, 30 जुलै 2021 :- ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

केंद्राच्या या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 27 टक्के तर इडब्ल्यूएसच्या प्रवर्गातील उमेदवारांना 10 टक्के आरक्षण मिळणार आहे.

2021-22 पासून निर्णय लागू

मोदी सरकारनं ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली. मेडिकलच्या कोर्समध्ये ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षणाची घोषणा सरकारच्यावतीनं करण्यात आली. 2021-22 वर्षासाठी हे आरक्षण लागू असेल. ओबीसी, तसंच ईडब्लूएस अशा दोन्ही वर्गांना या आरक्षणाचा लाभ होईल.

Advertisement

यात पदी,पदव्युत्तर मेडिकल/डेंटल कोर्समध्ये ओबीसींना 27 टक्के तर ईडब्लूएस ॉच्या विद्यार्थ्यांना 10 टक्के आरक्षणाचा फायदा मिळेल. या आरक्षणाचा फायदा ‘ऑल इंडिया कोटा स्कीम’च्या माध्यमातून मिळेल.

सुमारे 5 हजार 550 विद्यार्थ्यांना मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा होईल. दरवर्षी एमबीबीएसच्या दीड हजार ओबीसी विद्यार्थ्यांना तर पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या 2500 ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल.

ईडब्लूएसच्या आरक्षणाचा लाभ एमबीबीएसमध्ये 550 तर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये एक हजार विद्यार्थ्यांना आरक्षण मिळेल. विशेष म्हणजे सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एकूण जागांच्या 15 टक्के जागा या अँडरग्रॅज्युएट तर पोस्ट ग्रॅज्युएटच्या 50 टक्के सीटस् ह्या ऑल इंडिया कोट्यात येतात.

Advertisement

ओबीसींचा असंतोष कमी होईल ?

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का बसल्यानंतर देशभरात ओबीसींमध्ये असंतोष आहे. त्यातच उच्च शिक्षणातल्या आरक्षणात मोदी सरकारने निर्णय घ्यावा, म्हणून दबाव निर्माण झाला होता. त्यातच उत्तर प्रदेशासह सहा राज्यांत निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दोनच दिवसांपूर्वी मोदी यांनी संबंधित मंत्र्यांना हा प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानंतर आता हा निर्णय झालाय.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker