अबब! मुकेश अंबानींच्या रिलायन्सचा मोठा विक्रम; एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींचा नफा

MHLive24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स आज 4 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. यामुळे कंपनीच्या शेअर्सची किंमत 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली. यासह, कंपनीचे बाजार मूल्य 15 लाख कोटींच्या पुढे गेले. किंबहुना कंपनीने आपला एक वर्ष जुना विक्रम मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. (Reliance’s big record )

रिलायन्सच्या शेअर्समध्ये जुलैच्या अखेरीपासून कंपनीच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. तज्ञांच्या मते, रिलायन्सच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओने मिळवलेला नफा आहे.

रिलायन्सचे शेअर 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले :- बीएसईच्या आकडेवारीनुसार, रिलायन्सचा शेअर 4.12 टक्के किंवा 94.60 रुपयांच्या वाढीसह 2388.25 रुपयांवर बंद झाला. तर ट्रेडिंग सेशन मध्ये , कंपनीचे शेअर 2394.20 रुपयांसह 52 आठवड्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. परवा कंपनीचे शेअर 2293.65 रुपये प्रति शेअरवर बंद झाले.

Advertisement

15 लाख कोटींची कंपनी :- दुसरीकडे, रिलायन्स इंडस्ट्रीजने आणखी एक विक्रम केला आहे. आकडेवारीनुसार, कंपनीचे मार्केट कॅप आज 15 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. रिलायन्स ही देशातील पहिली कंपनी आहे ज्यांचे मार्केट कॅप 15 लाख कोटी पार केले आहे. बाजार बंद होईपर्यंत मार्केट कॅप 15,14,017.50 कोटी होती.

मार्केट कॅप मध्ये किती वाढ :- दुसरीकडे, रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गुरुवारी जेव्हा शेअर बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 14,54,046.37 कोटी होते, जे काल बाजार बंद होताना 15,14,017.50 कोटींवर पोहोचले. याचा अर्थ कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये गुरुवारच्या तुलनेत सुमारे 60,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

का वाढ झाली होती ? :- ब्लू चिप शेअर्स जास्त मागणी असल्यामुळे एवरेज डेली वॉल्‍यूम वाढल्याने शेअर बाजारातील कंपनीचे मूल्यांकन हळूहळू वाढत आहे. लोक विशेषतः ग्रीन एनर्जी क्षेत्रात विस्तार करण्यासाठी इतर कंपन्यांचे अधिग्रहण करून RIL चे शेअर्स खरेदी करत आहेत. दुसरीकडे, जून महिन्यापासून अर्थव्यवस्था पुन्हा सुरू झाली आहे, ज्यामुळे रिटेल आणि एनर्जी व्यवसायात तेजी आली आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker