नोंद 82 हजार, मदत साडेचार हजार महिलांना

MHLive24 टीम, 28 जुलै 2021 :-  शहरात सुमारे ८२ हजार घरेलू कामगारांची नोंदणी झालेली असताना राज्य सरकारची दीड हजार रुपयांची मदत फक्त चार हजार ५०० महिलांपर्यंत पोचली आहे. हे अनुदान मिळण्यासाठी महिलांच्या शासकीय नोंदणीत अडथळा येत आहे, तो दूर झाल्यावरच उर्वरित महिलांना अनुदान मिळणार आहे. एकीकडे शासकीय निधी तळापर्यंत पोचत असला, तरी प्रशासकीय प्रक्रियेतील अडचणी या अनुदान वाटपाच्या मुळावर येत आहेत.

टाळेबंदीच्या काळात असंघटित कामगारांना अनंत अडचणींना सामना करावा लागला. त्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येकी दीड हजार रुपयांचे एकरकमी अनुदान देण्याचे जाहीर केले. रिक्षाचालकांना हे अनुदान मिळाले; परंतु घरेलू कामगारांची कामगार आयुक्तालयात झालेली अपुरी नोंदणी ही त्यात अडचण ठरत आहे.

कामगार आयुक्तालयाकडे नोंदणी झालेल्या सुमारे चार हजार ५०० महिलांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा झाले आहेत. उर्वरित महिलांच्या नोंदणीसाठी कामगार कार्यालयाने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले आहेत; मात्र शहर आणि परिसरात सुमारे एक लाखाहून अधिक घरेलू कामगार आहेत.

Advertisement

स्वयंपाकी, धुणी-भांडी करणाऱ्या तसेच घराची स्वच्छता करणाऱ्या महिलांचा घरेलू कामगारांत समावेश होतो. महिलांना नोंदणीसाठी वार्षिक ३० रुपये खर्च येतो.

आता पुढे काय होणार ? :- राज्यात २०११ ते २०१४ दरम्यान घरेलू कामगार मंडळ होते. त्यात सुमारे ६० हजार महिलांची नोंदणी झाली आहे. या महिलांनी त्यांच्या नोंदणीचे दरवर्षी नूतनीकरण केल्यास त्यांना शासकीय योजनांचे फायदे मिळतात; परंतु त्यातील बहुसंख्य महिलांनी नोंदणी केलेली नाही.

त्यामुळे या महिलांकडे पहिल्या नोंदणीची पावती असल्यास त्यांनाही अनुदान द्यावे, अशी अनेक स्वयंसेवी संस्थांची मागणी आहे. त्यानुसार घरेलू कामगार मंडळात नोंदणी केलेल्या महिलांना पावतीच्या आधारे अनुदान वाटप करण्यासाठी कामगार कार्यालयाने राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. ती मिळेल, असा त्यांना विश्वास आहे.

Advertisement

काय आहे नेमकी अडचण ? :- ज्या महिलांची कामगार आयुक्त कार्यालयात ३१ मार्च पर्यंत नोंदणी झाली आहे आणि ज्यांचे वय ६० वर्षे नाही, अशा सर्वांना प्रत्येकी दीड हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. २०१४ ते २०२१ दरम्यान सुमारे दहा हजार महिलांची नोंदणी झाली आहे. त्यातील ८५०० महिला अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत.

त्यातील चार हजार ५०० महिलांना अनुदान मिळाले आहे. उर्वरित चार हजार महिलांच्या बॅंक खात्याचे तपशील मिळविण्यासाठी कामगार कार्यालयाचे प्रयत्न सुरू आहेत. महिलांची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध असली तरी, त्यांचे बॅंकेचे तपशील, आधार कार्ड क्रमांक प्रशासनाकडे नाहीत. त्यामुळे अनुदान वाटपात अडचणी येत आहेत.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker