RBI’s action against SBI: स्टेट बँकेवर रिझर्व बँकेची मोठी कारवाई; वाचा…

MHLive24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- रिझर्व्ह बँकेने काल एका बँकेवर निर्बंध लादले होते. महाराष्ट्रातील मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर सदर निर्बंध लादण्यात आले होते. हि कारवाई ताजी असतानाच आणखी एक वृत्त आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाला 1 कोटीचा दंड ठोठावला आहे.(RBI’s action against SBI)

आरबीआयने केलेल्या तपासणीत एसबीआयने कर्ज घेणाऱ्या कंपनीमध्ये जास्तीचे शेअर्स विकत घेतल्याचे आढळून आले आहे.

कर्जाच्या बदल्यात कंपनीने बँकेला शेअर्स देऊ केलेत. कोणत्याही बँकेसाठी तारण मर्यादा पेड-अप शेअर भांडवलाच्या कमाल 30 टक्क्यांपर्यंत असू शकते.

Advertisement

भारतीय रिझर्व्ह बँकेने 16 नोव्हेंबरला हा आदेश जारी केलाय. RBI चा हा निर्णय बँकिंग नियमन कायदा 1949 च्या उपकलम (2) च्या तरतुदींनुसार घेण्यात आलाय. आरबीआयने कलम 47 अ(1)(सी) अंतर्गत आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून हा आदेश जारी केला आहे.

रिझर्व्ह बँकेने काल महाराष्ट्रातील मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहेत. आर्थिक स्थिती ढासळल्याने सहकारी बँकेवर बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयने खातेदारांसाठी पैसे काढण्याची मर्यादा निश्चित केली आहे.

मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना खात्यातून 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. याशिवाय आरबीआयने बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत.आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बुधवारी व्यवसाय बंद झाल्यापासून सहा महिने हे निर्बंध लागू राहतील.

Advertisement

तथापि, मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की या सहकारी बँकेला निर्देश जारी करणे म्हणजे बँकिंग परवाना रद्द करणे असे समजू नये. म्हणजेच मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द झालेला नाही.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker