RBI ने आता ‘ह्या’ बँकेस ठोठावला मोठा दंड, जाणून घ्या…

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :-  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपला कारवाईचा बडगा सुरूच ठेवला आहे. आता अनेक मोठ्या बॅंकानंतर सर्वोदय वाणिज्यिक सहकारी बँकेला 1 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. संचालक, नातेवाईक आणि कंपन्यांना कर्ज देण्याबाबत आणि अॅडव्हान्ससंदर्भातील बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने 27 जुलै रोजी हा दंड ठोठावलाय.

रिझर्व्ह बँकेने कायदा 1949 च्या कलम 46 (4) (i) आणि बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 56 च्या कलम 47 A (1) (C) सह रिझर्व्ह बँकेनं अधिकारांचा उपयोग करून हा दंड ठोठावलाय. ही कारवाई नियामक अनुपालन कमतरतेवर आधारित आहे. बँक आणि त्याच्या ग्राहकांमधील कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह ठेवण्यासाठी नाही.

‘या’ कारणासाठी बँकेकडून दंड आकारला जातो :- 31 मार्च 2018 रोजी रिझर्व्ह बँकेने बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात बँकेची वैधानिक तपासणी केली आणि त्यावर आधारित अहवाल आणि संबंधित सर्व पत्रव्यवहाराची तपासणी, इतर गोष्टींद्वारे ही बाब उघडकीस आली. त्यात आरबीआयच्या सूचनांचे पालन झाले नसल्याचं समोर आलं.

Advertisement

बँक बुडल्यास ठेवीदारांच्या पैशांबाबत सरकारचा मोठा निर्णय :- जर रिझव्‍‌र्ह बँकेने तुमच्या बँकेवर मोरेटोरियम लावले असेल तर 90 दिवसांत तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील. ज्यांच्यावर हे मोरेटोरियम लागू आहे किंवा भविष्यात होईल अशा ग्राहकांसाठी ही दिलासाची बातमी आहे. या बदलानंतर 98 टक्के बँक खाती पूर्णपणे सुरक्षित होतील.

98.3% खाती होतील कवर :- आज केंद्रीय मंत्रिमंडळाने या निर्णयाला मान्यता दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की DICGC बिल 2021 च्या अंतर्गत सर्व ठेवींपैकी 98.3 टक्के रक्कम कवर केली जाईल. डिपॉजिट मूल्यांपैकी 50.9% मूल्याचे संरक्षण केले जाईल.

अर्थमंत्री म्हणाले की पहिल्या 45 दिवसांत अडचणीतील बँका त्यांची सर्व खाती जमा करतील, जिथे दावे करावे लागतील. हे प्रस्ताव डीआयसीजीसीला देण्यात येतील. ते पुढे म्हणाले की डीआयसीजीसी दिलेली खाती तपासून ठेवीदारांना सुमारे 90 दिवसांत पैसे देईल.

Advertisement

बचत, एफडी, चालू किंवा आवर्ती ठेवी यासारखी बँक ठेवी डीआयसीजीसी कव्हर करेल. यामध्ये वाणिज्यिक, सार्वजनिक, खासगी क्षेत्रातील बँका आणि भारतातील परदेशी बँकांच्या शाखांचा समावेश असेल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker