परमबीरांविरोधातील खंडणीची कारवाई तीन वर्षानंतर

MHLive24 टीम, 31 जुलै 2021 :-  मुंबईचे माजि पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह पाच पोलिस अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यासह 28 जणांविरोधात खंडणी वसूल करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, जबरी चोरी यासारख्या 10 हून अधिक कलमांतर्गत ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षानंतर याची दखल ठाणे नगर पोलिसांनीया प्रकरणी कारवाई सुरू केली आहे.

पाच अधिकाऱ्यांसह 28 लोकांवर गुन्हे दाखल :- पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये पोलिस उपायुक्त दीपक देवराज, सहाय्यक पोलिस आयुक्त एन. टी. कदम, खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मोरे, पोलिस कर्मचारी चौधरी सह अन्य लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई टाळायची असेल तर पैसे दे :- मोक्का अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांची खंडणी तक्रारदार आणि त्यांच्या साथीदारांकडून वसूल करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कुख्यात गुंड रवी पुजारी आणि प्रदीप शर्मा यांचे हितसंबंध असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Advertisement

नेमकं प्रकरण काय ? :- परमबीर सिंह हे ठाणे पोलिस आयुक्त असताना 2018 मध्ये गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सट्टेबाजांचे रॅकेट उद्धवस्थ केले होते. पोलिसांनी याप्रकरणात काही बाॅलिवुड कलाकारांनाही ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी मुंबईतील एक व्यावसायिक केतन तन्ना आणि सोनू जालान यांना अटक केली होती.

पावणेपाच कोटींची खंडणी :-  या अटकेनंतर आरोपींविरोधातील मोक्का कायद्याअंतर्गत होणारी कारवाई टाळणे तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन पोलिस अधिकारी, कर्मचारी, गुंड रवी पुजारी, दलाल, पोलिस खबरी यांच्यासह 28 जणांनी सोनु जालान याच्याकडून 3 कोटी 45 लाख रुपये तर केतन तन्ना याच्याकडून 1 कोटी 25 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीच्या आधारे ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रदीप शर्मा यांचे गुंड रवी पुजारी याच्यासोबत हितसंबंध असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker