Ramdev baba trolled : ..तर पेट्रोल ३० रुपये लिटर होईल असे काँग्रेसच्या काळात म्हणाले होते रामदेव बाबा; आता किमतींबाबत विचारला प्रश्न तर दिल ‘हे’ उत्तर , सोशल मीडियावर झाले ट्रोल

MHLive24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. आज अर्थात शनिवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 35-35 पैशांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत दिल्लीसह देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलने लिटरमागे 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.(Ramdev baba trolled )

दरम्यान, बाबा रामदेव यांचे पेट्रोल आणि डिझेलबाबतचे वक्तव्यही खूप चर्चेत आहे. खरे तर यूपीए सरकारच्या काळात बाबा रामदेव यांनी ट्विट केले होते की, काळा पैसा परत आला तर पेट्रोल 30 रुपये प्रति लिटरने मिळेल. मात्र, आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेत बाबा रामदेव यांनी आता आर्थिक आव्हानांचे नाव घेत सरकारचा बचाव केला आहे.

यासंबंधीचा बाबा रामदेव यांचा व्हिडीओही खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये त्यांना विचारण्यात आले होते की, जर तुम्ही म्हणाले होते की, काळा पैसा आला तर पेट्रोल 30 रुपये प्रति लिटरने मिळेल? पण आता किंमती वाढतच आहेत.

Advertisement

म्हणजे काळा पैसाही वाढत आहे का? त्यावर उत्तर देताना बाबा रामदेव म्हणाले की, काळ्या पैशासाठी, भ्रष्टाचारासाठी आम्ही संपूर्ण देशात जे आंदोलन सुरू केले, त्यावेळी मी काही तरतुदी ठेवल्या होत्या.

बाबा रामदेव यांनी आपल्या वक्तव्यात पुढे म्हटले आहे की, “विविध प्रकारच्या आर्थिक सुधारणांचे काय कार्यक्रम होते, मी म्हणालो की जर कच्च्या तेलाच्या दरानुसार तेल विकले जाते आणि कर कमी केला जातो, तर मी जे बोललो ते नक्कीच ते होऊ शकले असते.

आता ज्या प्रकारे सरकारने संपूर्ण अर्थव्यवस्थेचे पालनपोषण केले आहे त्यांसुर आता आर्थिक गरज वेगळ्या आहेत. बाबा रामदेव त्यांच्या वक्तव्यात पुढे म्हणाले की, “विविध आर्थिक आव्हाने आहेत, सरकारला सरकार देखील चालवायचे आहे, राष्ट्रहिताचे सामाजिक कार्यही सुरू ठेवावे लागणार आहे.

Advertisement

त्यामुळे जो कर आहे, तो हटवणे त्यांना जमत नाही. पण कधीतरी हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, हीच आशा आहे.” बाबा रामदेव यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांसह सोशल मीडिया यूजर्सही भरपूर ट्विट करत आहेत.

काँग्रेस नेते श्रीनिवास बीवी यांनी बाबा रामदेव यांच्या या वक्तव्यावर टीका करताना म्हटले आहे की, “अब तो लाला जी के मुंह में ‘दही’ जम चुका है।” प्रसिद्ध कॉमेडियन आणि लेखक राजीव निगम यांनी बाबा रामदेव यांची खिल्ली उडवली आणि लिहिलं आहे की, “हो सकता है बाबा जी भी फूंकते हों। वरना इतनी ऊंट-पटांग बातें कोई कैसे कर सकता है।”

पत्रकार हेमवती नंदन राजौरा यांनी बाबा रामदेव यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker