Rakesh JhunJhunwala Portfolio :बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.

त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. अशातच बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या रॅलिस इंडियाच्या स्टॉकवर गेल्या एक वर्षापासून विक्रीचा दबाव आहे.

गेल्या एका वर्षात राकेश झुनझुनवाला यांच्याकडे असलेला हा हिस्सा जवळपास 36 टक्क्यांनी कमी झाला आहे. या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत हा स्टॉक NSE वर रु. 276 वरून रु. 198 वर घसरला आहे.

या वर्षी आतापर्यंत स्टॉक सुमारे 3 टक्क्यांनी घसरला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात हा शेअर घसरला आणि 194 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेला. एप्रिल 2022 मध्ये, रॅलिस इंडियाला थोडी गती मिळाल्याचे दिसले.

परंतु आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीच्या कमकुवत निकालानंतर, स्टॉकवर सतत दबाव आहे. कोविड- 19 ब्रेकआउटपासून, कंपनी पुरवठा साखळीशी संबंधित समस्यांना तोंड देत आहे, ज्यामुळे कंपनीचे तिमाही निकाल खराब होत आहेत.

चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना, कंपनीने म्हटले होते की चौथ्या तिमाहीतही कंपनीसाठी ही समस्या कायम राहिली. त्याच बरोबर, वाढत्या महागाईने कंपनीच्या मार्जिनवर एक वेगळा दबाव ठेवला.

तथापि, रॅलिस इंडियाच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की येत्या तिमाहीत सामान्य मान्सूनचा अंदाज आणि देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेतील वस्तूंच्या किमती स्थिर असल्यामुळे कंपनीची कामगिरी सुधारेल.

राकेश झुनझुनवाला यांची रॅलीस इंडियामध्ये होल्डिंग :- मार्च 2022 च्या तिमाहीसाठी Rallis India च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला या दोघांचेही कंपनीत होल्डिंग आहे.

राकेश झुनझुनवाला यांची कंपनीत होल्डिंग 13885570 शेअर्स किंवा 7.14 टक्के आहे. त्याच वेळी, रेखा झुनझुनवाला यांची होल्डिंग 5182,750 शेअर्स किंवा 2.67 टक्के आहे.