Rakesh JhunJhunwala Portfolio : बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.

त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला वेळोवेळी आपला पोर्टफोलिओ बदलत राहतात.

कधी ते कंपनीतील स्टेक वाढवतात तर कधी कपात करतात. यावेळी राकेश झुनझुनवाला यांनी डेल्टा कॉर्पमधील त्यांची हिस्सेदारी 7 1 टक्क्यांवरून 6.2 टक्क्यांवर आणली आहे.

स्टॉकवर परिणाम: या बातमीनंतर, डेल्टा कॉर्पचे शेअर्स बुधवारच्या व्यवहारात 6 टक्क्यांहून अधिक घसरले आणि दिवसाची नीचांकी पातळी 202 रुपयांवर गेली. तथापि, नंतर खालच्या स्तरावरून थोडी रिकव्हरी झाली आणि शेअरचा भाव 2.70 टक्क्यांनी घसरून 212.30 रुपयांवर बंद झाला.

डेल्टा कॉर्पमध्ये झुनझुनवाला: नोव्हेंबर 2016 मध्ये, राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या पत्नीसह डेल्टा कॉर्पमध्ये 10% हिस्सा विकत घेतला. ऑक्टोबर 2017 ते 27 मे 2022 पर्यंत, गुंतवणूकदाराने कंपनीतील 57,50,000 समभागांची विक्री केली, ज्यामुळे हिस्सा 7.1 टक्के झाला.

राकेश झुनझुनवाला यांनी 27 मे ते 31 मे दरम्यान सुमारे पाच दिवसांत 25 लाख म्हणजेच 0.9% शेअर्स विकले. यानंतर, डेल्टा कॉर्पकडे आता बिग बुलच्या पोर्टफोलिओमध्ये 6.2 टक्के किंवा 1,65,00,000 शेअर्स आहेत.

डेल्टा कॉर्पचा निव्वळ नफा मार्च तिमाहीतही घसरला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 58 कोटी रुपयांच्या तुलनेत मार्च तिमाहीत तो 17 टक्क्यांनी घसरून 48 कोटींवर आला आहे. तथापि, कंपनीची विक्री किरकोळ वाढून 218 कोटी रुपये झाली.