Rakesh JhunJhunwala Portfolio : बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.

त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. वास्तविक शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे जोखमीची गुंतवणूक, जिथे परताव्याची खात्री नसते.

यामुळेच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी मोठ्या संख्येने लोक शेअर बाजारातील बड्या खेळाडूंच्या गुंतवणुकीवर आणि ब्रोकरेजच्या टिप्पण्यांवर लक्ष ठेवतात.

शेअर बाजारात बिग-बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी फेडरल बँकेच्या शेअरमध्ये पैसे गुंतवले आहेत. कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले.

तज्ञ ताज्या आकडेवारीला कमकुवत मानत आहेत. मात्र, दुसरीकडे ब्रोकरेज आनंद राठी पुढील तिमाहीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत आहेत.

शेअरची किंमत 115 रुपयांपर्यंत जाईल ब्रोकरेजला विश्वास आहे की फेडरल बँकेच्या शेअरची किंमत 115 रुपयांपर्यंत जाऊ शकते. सध्या कंपनीच्या शेअरची किंमत रु.91 आहे. म्हणजेच, सध्याच्या शेअरच्या किमतीपेक्षा 26 टक्क्यांनी अधिक झेप आगामी काळात पाहायला मिळू शकते.

आनंद राठीच्या अहवालानुसार, “मालमत्तेचा दर्जा सुधारला आहे कारण घसरणी अपेक्षेपेक्षा कमी होती. पूर्वीपेक्षा कमी तणाव असेल, त्यामुळे कमाई चांगली होईल.

बँकेच्या भक्कम दायित्वे आणि चांगले भांडवलीकरण यामुळे बाजारातील वाटा वाढणे अपेक्षित आहे. उच्च व्याजदर वातावरणामुळे NIM सध्याच्या पातळीपासून वाढू शकते.

राकेश झुनझुनवाला यांचा वाटा किती? राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीकडे गेल्या तिमाहीतील फेडरल बँकेच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार कंपनीचे शेअर्स आहेत.

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार फेडरल बँकेचे 2.64 टक्के स्टॉक किंवा 5,47,21,060 शेअर्स आहेत.

त्याच वेळी, त्यांच्या पत्नीकडे 2,10000,000 शेअर्स किंवा 1.01 टक्के शेअर्स आहेत. पती-पत्नी मिळून फेडरल बँकेत एकूण 3.65% हिस्सा धारण करतात.