Rakesh JhunJhunwala Portfolio : बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.
त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. अशातच ज्वेलरी कंपनी टायटनने मार्च 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.
मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचा स्वतंत्र नफा वार्षिक 7.18 टक्क्यांनी घसरून 529 कोटी रुपयांवरून 491 कोटी रुपयांवर आला आहे.
त्याच वेळी, ऑपरेशन विक्रीतून मिळणारा महसूल 3.46 टक्क्यांनी घसरून 6,749 कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीत 6,991 कोटी रुपयांवर होता.
या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न रु. 7,352 कोटी होते जे मागील वर्षी याच तिमाहीत रु. 7,169 कोटी होते. म्हणजेच वर्ष-दर-वर्ष आधारावर या तिमाहीत कंपनीच्या कमाईत 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सोमवारी टायटनचा शेअर 3 टक्क्यांनी घसरून 2386 रुपयांवर बंद झाला. मार्च 2022 च्या तिमाहीत घड्याळे आणि वेअरेबल व्यवसायामुळे टायटनला इतर विभागातील फायदा झाला.
या व्यवसायातून कंपनीला 12 टक्के नफा झाला आहे. टायटनने या वर्षीच्या मार्च तिमाहीत या विभागातून 622 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे, जे मागील वर्षी 555 कोटी रुपये होते.
त्याच वेळी, कंपनीने iCare व्यवसायातून वर्षभरात 6 टक्के वाढ केली आहे आणि या विभागातून 134 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.