Rakesh Jhunjhunwala loss money : राकेश झुनझुनवाला यांना मोठा झटका ! 1 आठवड्यातच गमावले 753 कोटी रुपये, तुमच्याकडेही आहेत का ‘हे’ शेअर्स?

MHLive24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- शेअर बाजारातील बादशहा ज्यांना भारताचे वॉरेन बफे म्हटले जाते असे राकेश झुनझुनवाला यांच्या पोरटीओफोलोकडे अनेकांचे लक्ष असते. आता आलेल्या वृत्तानुसार झुनझुनवाला यांच्या विश्वासार्ह स्टॉकला मोठा धक्का बसला आहे.( Rakesh Jhunjhunwala loss money)

शुक्रवारी शेअर बाजारातील जोरदार घसरणीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आठवड्यातील शेवटचा व्यवहारी दिवस अर्थात शुक्रवार हा गुंतवणूकदारांसाठी ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला. टायटन कंपनीचे शेअर्स शुक्रवारी सुमारे 4.37 टक्क्यांनी घसरले.

या संपूर्ण आठवड्याचा विचार करता हा शेअर 7 टक्क्यांहून अधिक घसरला. टायटन कंपनीच्या या शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे बाजारातील बिग बुल म्हटल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीतही घसरण झाली आहे. हा शेअर घसरल्याने झुनझुनवाला यांचे सुमारे 753 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Advertisement

टायटन कंपनीच्या शेअर्सचा रेकॉर्ड

राकेश झुनझुनवाला यांच्या या आवडत्या शेअरची किंमत सुमारे 2374 रुपयांवरून 2293 रुपये प्रति शेअर झाली. गेल्या आठवडाभरात टायटन कंपनीचा शेअर 2467 रुपयांवरून 2293 रुपयांपर्यंत घसरला. म्हणजेच या संपूर्ण कालावधीत प्रति शेअर 174 रुपये किंवा सुमारे 7 टक्के तोटा झाला आहे.

बिगबुलचे या टायटन कंपनीत किती होल्डिंग आहे?

Advertisement

राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी जुलै ते सप्टेंबर 2021 या तिमाहीसाठी या कंपनीत हिस्सेदारी आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे एकूण 3,37,60,395 शेअर्स आहेत, जे कंपनीच्या भांडवलाच्या 3.80 टक्के आहेत.

त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 95,40,575 शेअर्स किंवा 1.07 टक्के हिस्सा आहे. राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 4,33,00,970 शेअर्स म्हणजेच एकूण 4.87 टक्के हिस्सा आहे.

राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीत घट

Advertisement

या आठवड्यात टायटन कंपनीच्या शेअरच्या किमतीत 174 रुपयांची घसरण झाली आहे. या प्रकरणात, राकेश झुनझुनवाला यांचा निव्वळ तोटा अंदाजे ₹753 कोटी (₹174 x 43300970) आहे. म्हणजेच या शेअरने झुनझुनवाला यांना मोठा झटका दिला आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker