राज कुंद्राचा वकील म्हणतो, ‘नोटीस न देता केलेली कारवाई बेकायदेशीर’!

MHLive24 टीम, 30 जुलै 2021 :- अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईविरोधात राज कुंद्रा याच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नोटीस न देता केलेली अटक आणि कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा राज कुंद्राच्या वकिलांनी केला.

कुणाला जामीन हवाय, कुणाला अटकपूर्व :- अश्लील चित्रपट निर्मितीशी संबंधित सर्वांवर मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरू आहे. या कारवाईशी संबंधित अनेकांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे. कुणी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी तर कुणी बदनामी टाळण्यासाठी तर राज कुंद्रा याने बेकायदेशीर अटकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

उद्या सुनावणी :- या याचिकेवर राज कुंद्राच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली. “आम्हाला आरपीसीसी कायदा 41 अनुसार नोटीस देणं आवश्यक होत; मात्र ती नोटीस देण्यात आली नाही. यामुळे आमची अटक ही बेकायदेशीर आहे,” राजचे वकील आबाद फोनडा यांनी न्यायालयात सांगितलं. आजची सुनावणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे ही सुनावणी आता उद्या (ता. 31) ठेवली आहे. शनिवारी सरकारी वकील आपली बाजू मांडणार आहेत.

Advertisement

नेमका युक्तिवाद काय? :- राज कुंद्रा आणि रॉयन थोरपे यांनी त्यांची अटक बेकायदेशीर आहे, या मुद्द्यावरुन मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. कुंद्रा आणि रॉयन यांचे वकील आबाद फोनडा यांनी युक्तिवाद केला.

“आमच्याकडे यापूर्वीही पोलिस चौकशीसाठी आले होते. याप्रकरणी आधीही आमची चौकशी झाली आहे. त्यानंतर 19 जुलैला पोलिस आले. त्यांनी झडती घेतली. त्यानंतर अटक केली,” असं ते म्हणाले.

अभिनेत्री शर्लिन चोप्राचा अटकपूर्व जामीन नामंजूर :- मुंबई गुन्हे शाखेने अभिनेत्री शर्लिन शर्लिन चोप्रा हिला समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावलं होतं. राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी त्याला अटक झाली आहे. पोलिसांना याच गुन्ह्याबाबत शर्लिन हिची चौकशी करायची होती; मात्र तिने चौकशीला सामोरं न जाता थेट अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मुंबई अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सुनावणी झाली. न्यायालयानं तिला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे.

Advertisement

शिल्पा शेट्टीचा सिव्हिल सूट दाखल :- राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी अटक केली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही त्याची पत्नी आहे. त्यामुळे राज याला अटक केल्यानंतर या प्रकरणाशी शिल्पा हिचाही संबंध लावला जात आहे; मात्र या घटनेशी आपला काहीही संबंध नाही, असं शिल्पा सांगत आहे.

यानंतरही तिच्या विरोधात काही चॅनेल आणि युट्यूब चॅनेलवर शिल्पा हिचा संबंध लावून बातम्या येत आहेत. या विरोधात शिल्पा शेट्टी हिने मुंबई उच्च न्यायालयात सिव्हिल सूट दाखल केला. या याचिकेत तिने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

शिल्पाचे नेमकं म्हणणे काय? :- शिल्पाने याचिकेत 29 जणांना प्रतिवादी केलं आहे. हे प्रतिवादी काही चॅनलचे प्रमुख आहेत. युट्यूब चॅनेलचे प्रमुख आहेत. आपला पॉर्न फिल्म प्रकरणाशी काही संबंध नाही. तरीही प्रतिवादी आपली बदनामी करत आहेत. यामुळे या प्रतिवाद्यांना आपल्या विरोधात बदनामीकारक लिखाण करण्यास, बातमी बनवण्यास आणि ती छापण्यास, प्रसारित करण्यास मनाई करावी, असं याचिकेत म्हटलं आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker