अनिल देशमुखांसह दोन बड्या पोलिस अधिका-यांच्या घरांवर छापे

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :- राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सीबीआय आणि ईडी ॲक्शन मू़डमध्ये आल्या आहेत. देशमुख, पोलिस उपायुक्त राजू भुजबळ आणि सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्यांशी संबंधित १२ ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले. नगर जिल्ह्यातल संगमनेर येथेही छापा टाकण्यात आला.

मुंबई, ठाणे,पुणे, संगमनेरला छापे :- देशमुख यांनी सचिन वाझे याला दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआय व ईडी यांच्याकडून चौकशी सुरू आहे.

सीबीआयकडून मुंबई, ठाणे, पुणे नाशिक आणि संगमनेर या शहरांतील १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून त्यात दोन बड्या पोलिस अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांचीही झडती घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

कागदपत्रे व इलेक्टॉनिक पुरावे हाती :- पोलिस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या संगमनेरमधील घरावर तसेच सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्या पुणे येथील घरावर छापा टाकून सीबीआय टीमने झडती घेतली आहे. याशिवाय ठाणे, नाशिक, सांगली, अहमदनगर आणि पुणे येथे काल छापे टाकण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले. या कारवाईदरम्यान देशमुख प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे व इलेक्टॉनिक पुरावे हाती लागल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आल्याचेही सूत्रांनी नमूद केले.

ईडीचे पथक पोहचले संगमनेरमध्ये :- मुंबई पोलिस दलात उपायुक्त असलेल्या राजू भुजबळ यांचे घर संगमनेर तालुक्यात असून ईडीच्या पथकाने तिथे धडक दिली आहे. ईडीची टीम दोन वाहनांतून आली होती. त्यांनी भुजबळ यांच्या कुटुंबीयांचे जबाब घेतले तसेच कागदपत्रेही तपासल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक पोलिसांकडे मात्र याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करत असताना ईडीच्या हाती काही कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सअॅप चॅट डाटा सापडला असून त्याआधारावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आल्याचे कळते.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker