e-Shram Card: ई-श्रम कार्ड बनवण्यात येतीये अडचण? वापरा ‘ही’ ट्रिक्स, मिळेल लाखोंचा फायदा

MHLive24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- मोदी सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल सुरू केले. आतापर्यंत 2 कोटीहून अधिक कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. सध्या सार्वजनिक सेवा केंद्रांवर ई-श्रम कार्ड बनवणाऱ्यांची मोठी गर्दी आहे.(e-Shram Card)

कार्ड बनवणाऱ्यांच्या संख्येमुळे सर्व्हरवर मोठ्या प्रमाणावर भार पडल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतरही अनेकांना Currently experiencing heavy traffic, Please try after sometime असा संदेश मिळत आहे. जर तुम्हालाही असा मेसेज येत असेल, तर आम्ही तुम्हाला असा एक मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे ई-श्रम कार्ड बनवू शकाल.

Advertisement

हे करा ट्राय

ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी ही युक्ती एकदा करून बघा. यासाठी तुम्ही रात्री 12 ते सकाळी 11 पर्यंत ई-श्रम पोर्टल उघडा. हे काम तुम्ही तुमच्या घरी   लॅपटॉप किंवा मोबाईलवर करू शकता. प्रथम तुम्ही ई-श्रम पोर्टल उघडा https://www.eshram.gov.in/.

येथे तुम्हाला नोंदणी करावी लागेल, त्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांक प्रविष्ट करताच तेथील डेटाबेसमधील कामगाराची सर्व माहिती आपोआप पोर्टलवर दिसेल. तुमच्या बँक माहिती सोबतच तुम्हाला मोबाईल नंबरसह इतर महत्वाची माहिती भरावी लागेल. हा ऑनलाईन फॉर्म आणखी अपडेट केला जाऊ शकतो.

Advertisement

तुम्हाला 12 अंकी युनिक नंबर मिळेल

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय असंघटित क्षेत्रातील सुमारे 38 कोटी मजुरांसाठी 12-अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि ई-श्रम कार्ड जारी करेल, जे देशभरात वैध असेल. ई-श्रम कार्ड देशातील कोट्यवधी असंघटित कामगारांना नवी ओळख देईल.

हे लेबर कार्ड त्यांना भविष्यात सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्यास मदत करेल. बांधकाम कामगार, स्थलांतरित मजूर, रस्त्यावर विक्रेते या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात.

Advertisement

म्हणूनच पोर्टल तयार केले आहे

देशात असंघटित क्षेत्रात काम करणारे तीन किंवा चार प्रकारचे कामगार किंवा मजूर आहेत, ज्यांना खूप मदतीची गरज आहे. यामध्ये, ग्रामीण भागात शेतीचे काम करणारे किंवा कष्टकरी, इतर जे शहरात काम करतात , तिसरे म्हणजे जे स्वतःचाच रोजगार करतात, जसे की रस्त्यावर असणारे विक्रेते .

कोरोनाच्या काळात अनेक योजना चालवल्या गेल्या, पण त्या वेळी समस्या अशी होती की कोणताही डेटाबेस किंवा रेकॉर्ड नव्हता त्यामुळे थे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणे अवघड गेले. कारण हे मजूर एकाच ठिकाणी राहत नाहीत. त्यांना काम मिळेल तिथे ते जातात.

Advertisement

ई-श्रम पोर्टल आणि कार्डशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी

देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे.
देशातील प्रत्येक मजुरांची नोंद या पोर्टलवर ठेवली जाईल.
यामुळे पीएम श्रम योगी मानधन योजनेचा लाभ मिळेल.
यामुळे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळेल.
कामगार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या कक्षेत येतील.
कामगारांना कठीण काळात योजनांचा लाभ मिळेल.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करून 25 लाख रुपयांचा अपघात विमा.
अपघात विम्यावर सरकार एक वर्षाचा हप्ता भरेल.

नोंदणीकृत कामगाराच्या मृत्यूनंतर कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतील, तर पूर्ण अपंगत्व आल्यास कामगाराला 2 लाख रुपये मिळतील. .

Advertisement

आंशिक अपंगांना 1 लाख रुपये मिळतील.
ई-श्रम कार्ड देशभरात वैध असेल.
इतर राज्यांमध्ये काम मिळण्यासही सहजता येईल.
देशातील कोट्यवधी असंघटित कामगारांना ओळख मिळेल.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker