खुशखबर! सरकारने ‘ह्या’ 12 औषधांच्या किमती केल्या खूप कमी

MHLive24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- औषधांच्या किंमती ठरवणाऱ्या नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ने सोमवारी सांगितले की, त्यांनी 12 अँटी-डायबेटिक जेनेरिक औषधांसाठी कमाल मर्यादा निश्चित केली आहे. त्यांनी सांगितले की, यामध्ये ग्लिमेपिराइड गोळ्या, ग्लुकोज इंजेक्शन आणि इंटरमीडिएट अॅक्टिंग इन्सुलिन सोल्यूशन यांचा समावेश आहे.(prices of these 12 drugs very low)

एका ट्वीटमध्ये, औषध किंमत नियामकाने म्हटले आहे की, प्रत्येक भारतीयाला मधुमेहासारख्या आजारांवर उपचार करणे शक्य होण्यासाठी, NPPA ने 12 मधुमेहविरोधी जेनेरिक औषधांच्या किंमती कमी करण्याचे पाऊल उचलले आहे.

या औषधांमध्ये 1 मिलीग्राम ग्लिमेपिराईड टॅब्लेटचा समावेश आहे, ज्याची किंमत 3.6 रुपये प्रती टॅब्लेट आहे. त्याच्या 2 एमजीसाठी कमाल मर्यादा 5.72 रुपये प्रती टॅब्लेट ठेवण्यात आली. 25 टक्के ताकदीच्या 1 मिली ग्लुकोज इंजेक्शनची कमाल किंमत 17 पैसे ठेवण्यात आली. तर, 1 मिली इन्सुलिन इंजेक्शनची कमाल किंमत 15.09 रुपये असेल.

Advertisement

500 मिलीग्राम ताकदीच्या मेटफॉर्मिन तत्काळ रिलीझ टॅब्लेटची कमाल किंमत प्रती टॅब्लेट 1.51 रुपये निश्चित करण्यात आली. तर 750 मिग्राम औषधाची किंमत प्रती टॅब्लेट 3.05 रुपये आणि 1,000 मिलीग्राम ताकदीची किंमत 3.61 रुपये असेल. 1000 मिलीग्राम ताकद असलेल्या मेटफॉर्मिन कंट्रोल रिलीज टॅब्लेटची कमाल किंमत 3.66 रुपये असेल.

त्याचप्रमाणे 40 IU/ml ताकद असलेल्या 1 मिली इंटरमीडिएट अॅक्टिंग (NPH) सोल्यूशन इन्सुलिन इंजेक्शनची कमाल किंमत 15.09 रुपये निश्चित करण्यात आली. तर 40 IU/ml शक्तीचे 1 ml प्रिमिक्स इन्सुलिन 30:70 इंजेक्शनची किंमत देखील 15.09 रुपये आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker